डोंबिवली : अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज अर्णवच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधत संपूर्ण तपास जलदगतीने करण्यात येईल असे सांगत कुटुंबियांना दिलासा दिला. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार असून, पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी फास्टट्रॅक पद्धतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिवसेनाशिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी खैरे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे खैरे कुटुंबाशी संपर्क साधून दिला. कुटुंबाला धीर देत त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई होणारच.”
Arnav Khaire Death: भाषेचं विषारी राजकारण, तुमच्या मुलांसाठी मराठी मुलाचा जीव घेणार का? चित्रा वाघ यांचा सवालउपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस यंत्रणेला गतीमान तपासाचे निर्देश दिले. “अर्णवला न्याय मिळावा, हीच सरकारची पहिली जबाबदारी आहे. फास्टट्रॅक कोर्टात गुन्हा नेऊन शक्य तितक्या कमी कालावधीत कारवाई पूर्ण केली जाईल,” असे त्यांनी सांगत कुटुंबियांचे सात्वन करत त्यांना दिलासा दिला.
दरम्यान, अर्णवच्या मृत्यूने कल्याण आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट असून, सरकारने तात्काळ घेतलेल्या दखलीनंतर कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांना दिलासा मिळत आहे.
Thane Politics: शिंदे सेना-भाजपमध्ये श्रेयवाद, कानशिलात लगावल्याचा आरोप; राजकारण तापले!