Rajabhau Waje : उदय सांगळेंनी कोणत्या एअरपोर्टवर पैशांची बॅग आणली? खासदार राजाभाऊ वाजे यांचा सिन्नरमध्ये गौप्यस्फोट!
esakal November 24, 2025 04:45 AM

सिन्नर: लोकसभेच्या वेळी आपल्या विरोधात काम करताना उदय सांगळे यांनी कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कोणाकडून पैशांची बॅग आणली, कोणत्या लोकांना पैसे दिले, कुणाला वाटायला लावले याची माहिती आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे. येथील नर्मदा लॉन्सवर झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावान मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यास जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, उपनेते वसंत गिते, कोंडाजी आव्हाड, प्रकाश वाजे, हेमंत नाईक, काँग्रेसचे विनायक सांगळे, किरण डगळे आदी उपस्थित होते. खासदार वाजे म्हणाले, की आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत काळ हेच उत्तर असेल, असा विचार करून शांत होतो; परंतु सांगळे यांनी भाजप प्रवेशावेळी खासदारांनी काम केले नाही म्हणून खुलासे करावे लागत असल्याचे सांगितले.

वाजे यांनी २०१९ ची विधानसभा ते २०२४ ची लोकसभा निवडणुकीपर्यंत घडलेल्या घटनांची माहिती देत वेगवेगळे गौप्यस्फोट करीत आपल्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे सांगितले. आपल्याला काही करायचे असते तर २०१९ मध्ये विधानसभेत पराभूत झालो, तेव्हाच केले असते. सांगळे यांच्या पत्नीने त्यावेळी कुणाकुणाला फोन केले, भाऊ व वडिलांचे काय बोलणे होते याचे भांडवल केले असते. त्यावेळी आपल्याला अनेकांनी सांगळे यांनी घात केल्याचे सांगितले होते. परंतु, आपण उलट लोकांचीच समजूत घालून आपला घात नशिबाने केल्याचे सांगून शांत होतो, असे वाजे म्हणाले.

Kolhapur Politics : “अब तुम्हारी खैर नहीं”, हसन मुश्रीफांचा कोणाला इशारा; संजय मंडलिकांच्या पॅनेलवर काय म्हणाले...

वाजे यांनी केलेले गौप्यस्फोट

शीतल सांगळे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी माझी पुण्याई पक्षश्रेष्ठींकडे खर्ची घातली

सांगळे यांनी स्वतःहून आपल्याशी संपर्क तोडला

सांगळेंसह त्यांचे वडील, भाऊ, पत्नी काय बोलले याचे पुरावे आपल्याकडे

ता. १० जुलै २०२३ ला ॲड. माणिकराव कोकाटेंबरोबर सांगळेंची आपल्याविरोधात एकीसाठी बैठक

समाजाच्या मनात विष पेरून सांगळेंचे कुटिल कारस्थान

नगर परिषदेच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.