विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : नागपूर येथे प्रगती प्रतिष्ठान आणि भगवान बिरसा कला संघम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कला स्पर्धेला उत्साहात प्रतिसाद मिळाला. नृत्य, वाद्य, फोटोग्राफी, पेंटिंग, ब्लॉग, रील अशा विविध प्रकारांमध्ये राज्यभरातून स्पर्धकांनी आपली कला सादर केली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील अनेक कलाकारांनी उल्लेखनीय यश मिळवत जिल्ह्याचा आणि आदिवासी समाजाचा मान उंचावला आहे.
रील निर्मितीमध्ये मयूर तुंबडा, नृत्य स्पर्धेमध्ये रवि सातपुते यांचा प्रथम क्रमांक, तर चित्रकला स्पर्धेत डहाणूतील संदीप भोईर याचा द्वितीय, तर फोटोग्राफीमध्ये अमित भवारी याचा तृतीय क्रमांक आला आहे. वाद्य वादन स्पर्धेतील विक्रमगड नंदू बरतडे आणि नंदू कवटे यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक आला. गायनामध्ये सीता गावंधा हिचा तृतीय, ब्लॉग व्हिडिओसाठी अमृता डोके हिचा द्वितीय, तर नयन कांबडी हिचा तृतीय क्रमांक आला आहे.