नाश्ता केला अन् थोड्यावेळाने…हार्टअटॅकच्या आधी स्मृती मानधनाच्या वडिलांसोबत नक्की काय घडलं?
Tv9 Marathi November 24, 2025 04:45 AM

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होता. त्याची जय्यत तयारी झाली होती. लग्नाचा 4.30चा मुहूर्तही ठरला होता मात्र त्याआधीच एक दुर्दैवी घटना घडली.ती म्हणजे स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आला. लग्नाची तयारी सुरु असताना अचानक ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

स्मृतीच्या लग्नसोहळा पुढे ढकलला

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. अचानक श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे. समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. श्रीनिवास यांना सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

फार्म हाऊसवर तिच्या वडिलांसोबत नक्की काय घडलं?

दरम्यान याबद्दल श्रीनिवास यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर तोहीन मिश्रा यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, “आज सकाळी (23 नोव्हेंबर 2025) फार्म हाऊसवरच नाश्ता करत असताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली होती. पण आम्हाला वाटलं बरी होईल. म्हणून थोडावेळ थांबलो. पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारतेय. स्मृतीचा वडिलांवर जीव आहे. त्यामुळे जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही, असं तिने ठरवलंय.” अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मानधना कुटुंबाची प्रायव्हसी जपा, असं आवाहन देखील डॉक्टरांनी केलं आहे.

Hope uncle gets well soon🙏🧿
pic.twitter.com/Ft3U850gkM

— Siya (@siyaagrawal18)


लग्न स्थळाच्या ठिकाणी नक्की कसं वातावरण?

दरम्यान श्रीनिवास मानधना यांची तब्येत ठिक होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून. तोपर्यंत त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे आता लग्नसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आलं आहे. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा व विविध क्षेत्रातल्या दिगज्यांची उपस्थिती लागणार होती मात्र सगळाच कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच लग्न स्थळाच्या ठिकाणी डेकोरेशन काढण्याचे काम सुरु आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.