हिवाळ्यात रम किंवा अल्कोहोल प्यायल्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकला बरा होतो, असा अनेकांचा समज असतो. अनेकजण शरीर उबदार ठेवण्यासाठी थंडीत मर्यादित प्रमाणात अल्कोहोल पितात, ते फायदेशीर मानतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते यामागे वेगळे सत्य आहे.
थंडीच्या दिवसांत शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी गरम अन्नाचा आहारात समावेश करणे योग्य असते. कॅफिनयुक्त पेये चहा, कॉफी किंवा पौष्टिक सूप आणि रसाळ फळे थंडीत शरीराला ऊर्जा देतात.
रक्तप्रवाह वाढल्याने शरीरात वाढणारी उष्णतेची भावना केवळ तात्पुरती असते. प्रत्यक्षात अल्कोहोल शरीराचे मुख्य तापमान वेगाने कमी करते. यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता.
अल्कोहोलमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच यामुळे तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे तुमचे मूड स्विंग्स होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, थंडीत निरोगी राहण्यासाठी जाड कपडे घाला. रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट पाणी, सूप आणि रसाळ फळे खा.
थंडीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा. ज्वारी, बाजरी, नाचणी, काजू, बिया, आणि उष्णता निर्माण करणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे तुमचे शरीर आतून उबदार राहते.
थंडीच्या दिवसांत केवळ बाहेरील तापमान नव्हे, तर शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करावा. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या आतून ऊब मिळते आणि ऊर्जा टिकून राहते.
थंडीत तहान कमी लागते, पण शरीर आतून कोरडे पडू शकते. रम किंवा अल्कोहोल डिहायड्रेशन वाढवते. त्याऐवजी, साधे किंवा कोमट पाणी, पौष्टिक सूप आणि रसाळ फळे खाऊन शरीरातील द्रवाचे संतुलन राखा.