सिंदारोव्ह ठरला कमी वयाचा जगज्जेता!
Marathi November 28, 2025 02:25 PM

उझबेकिस्तानचा उदयोन्मुख ग्रँडमास्टर झव्होखिमीर सिंदारोव्ह याने बुद्धिबळ जगतात नवा इतिहास घडवत जगज्जेतेपद पटकाविले. त्याने अंतिम फेरीत चीनच्या वेई यी याचा पराभव केला. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत 19 वर्षीय सिंदारोव्हने वेई यीच्या एका चुकीचा फायदा घेत आपल्या कारकीर्दीतील पहिले जगज्जेतेपद पटकावले. याचबरोबर बुद्धिबळच्या इतिहासात तो सर्वात कमी वयाचा जगज्जेता ठरला, हे विशेष.

उमेदवार स्पर्धेसाठीही वर्ण

सिंदारोव्हची ही कामगिरी अधिक वैशिष्टय़पूर्ण ठरली. कारण तो स्पर्धेत 16 वा मानांकित खेळाडू म्हणून उतरला होता. मागील एका वर्षात मोठ्या स्पर्धांवर वर्चस्व गाजवणारा तो तिसरा किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.