बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमी चर्चेत असते. ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत दिसत नाही. त्यावरुन तिला बरचं ट्रोल करण्यात आलं. अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा अनेकदा पसरत असतात. आता पाकिस्तानी मौलवी मुफ्ती अब्दुल कावीने अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
बऱ्याच काळापासून ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत एका फ्रेममध्ये दिसलेली नाही. दोघांच्या नात्याबद्दल लोक सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतात. आता पाकिस्तानी मौलवीच स्टेटमेंट चर्चेत आहे.
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानी मौलवीने केलेल्या या वक्तव्यानंतर तिचे चाहते भडकले आहेत. सोशल मीडियावर या मौलवीची शाळा घेतली. पाकिस्तानी मौलवीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात ऐश्वर्या रायच नाव बदलून तो आयशा राय करणार असल्याचा दावा करत आहे.
पाकिस्तानी मौलवीने ऐश्वर्या राय बरोबर लग्नाची इच्छा व्यक्त केली. ऐश्वर्या राय पुढच्या दोन-चार महिन्यात मला लग्नाचा प्रपोजल पाठवेला असा या मौलवीला भलताच आत्मविश्वास आहे. मी ऐश्वर्याला मुस्लिम बनवणार. तिच्याशी लग्न करुन तिला आपली बेगम बनवेन अशी स्वप्न या पाकिस्तानी मौलवीने बोलून दाखवली.
मियां-बीवीमध्ये मतभेद असल्याचं ऐकू येतय. अल्लाहच्या कृपने त्यांच्यात सर्व काही सुरळीत राहूं दे. पण ते वेगळे झालेच तर इंशाअल्लाह ऐश्वर्याकडून मला निमंत्रण येईल असं या मौलवीने म्हटलं.