बॉलिवूडमधील “ही-मॅन” धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कलाकार अजूनही धक्क्यातच आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अगदी शाहरूख खानपर्यंत सर्वजण अजूनही या दु:खाचतून बाहेर येऊ शकलेले नाही. मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत कडक सुरक्षेत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. जिथे मीडिया, पापाराझी आणि बाहेरील लोकांना देखील आत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे सामान्य जनतेनेही संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्यालाही स्मशानभूमीत प्रवेश नाकारण्यात आला
स्मशानभूमीच्या बाहेरील व्हिडीओ मात्र बरेचसे व्हायरल झाले होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो एका अभिनेत्याचा. एका प्रसिद्ध अभिनेत्याला चक्क धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी आत जाण्यास प्रवेश नाकारण्यात आला. तो अभिनेता म्हणजे राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर. आर्य याला गेटवर थांबवून ठेवण्यात आले. त्याला आत जाऊ दिले जात नव्हते.
पापाराझींनी सांगून देखील त्या अभिनेत्यावा गेटवरच थांबवून ठेवण्यात आलं
जेव्हा राज बब्बरचा मुलगा आर्य बब्बर याला गेटवर थांबवण्यात आले तेव्हा एका पापाराझीने ओरडून सांगितले की, “त्याला जाऊ द्या, तो राज बब्बर यांचा मुलगा आहे,” पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी न ऐकता शेवटी त्याला आत येऊ दिले नाही. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोणालातरी फोन करत आहे आणि आर्य बब्बरला त्या व्यक्तीशी बोलण्यास सांगत आहे हे देखील दिसत आहे. त्यानंतर आर्य फोनवर बोलतो आणि नंतर त्याला आत सोडण्यात आलं.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी केलेल्या एवढ्या कडक सुरक्षेबद्दल चाहत्यांची नाराजी
या घटनेमुळे अजूनच देओल कुटुंबियांना ट्रोल केलं गेलं, कारण धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देखील एवढी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी किती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती यावरून हे स्पष्ट होते. लाडक्या अभिनेत्याच्या जाण्याचा शोक व्यक्त करण्यासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यांना निरोप देण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही आले होते. पण बाकी चाहत्यांना मात्र त्यांना शेवटचं पाहता आलं नाही याची खंत नक्कीच आहे.