Hema Malini Missed Dharmendra Prayer Meet: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ही – मॅन धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं… राहत्या घरीच धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई येथील ताज लँड्स एन्डमध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोक सभेत धर्मेंद्र यांना श्रद्धांजवी वाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते… पण हेमा मालिनी आणि तिच्या मुली ईशा देओल, अहाना दिसल्या नाहीत..
देओल कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेयर मीटमध्ये सनी देओल, बॉबी देओल, आई प्रकाश देओल यांच्यासह अन्या नातेवाईक देखील उपस्थित होते. बॉलिवूडमधून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान, आर्यन खान, सलमान खान, रेखा, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, अमीषा पटेल, सोहा अली खान, सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धूपिया, अंगद बेदी, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ यांसारखे अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते …
View this post on Instagram
धर्मेंद्र यांच्या शोक सभेत हेमा मालिनी दिसल्या नाही.. अशात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले. हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरात धर्मेंद्र यांच्यासाठी पूजा ठेवली होती… रिपोर्टनुसार, महिमा चौधरी, अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहूज आणि मुलगा यशवर्धन हेमा मालिनी यांच्या घराबाहेर दिसला…
एका व्हायरल व्हिडिओनुसार, धर्मेंद्र यांची पूजा करण्यासाठी एक पुजारी हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचला होता. मात्र हेमा आणि त्यांच्या मुली, ईशा आणि अहाना, शोक सभेला का उपस्थित राहिल्या नाहीत… शोक सभेत त्या उपस्थित राहिल्या नाहीत याबद्दल काहीही कळलेलं नाही…
हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांना भेटू दिलं नाही..
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांत हेमा मालिनी यांना पतीला भेटू देखील दिलं नाही… धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हेमा मालिनी यांना पतीसोबत राहायचं होतं.. पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबियांनी भेटू दिलं नाही… अशा देखील चर्चा रंगत आहे. पण सत्य नेमकं काय अद्याप समोर आलेलं नाही.
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर असं आहे… धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना 4 मुलं आहेत. सनी, बॉबी, अजीता आणि विजेता अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत…