राजेगाव, ता. २७ : पांढरेवाडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता. २६) संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच नीता कोंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच नीता कोंडे, सदस्य पूनम चव्हाण, अनिल झगडे, राजेंद्र कोंडे, धनसिंग जाधव, स्वाती शितोळे, तुषार भागवत आदी उपस्थित होते. स्वाती शितोळे यांनी आभार मानले.