महुडे खुर्दमध्ये १२४ गरजूंना अन्नधान्य, कपड्यांचे वाटप
esakal November 28, 2025 04:45 PM

महुडे, ता. २६ : महुडे (ता. भोर) खोऱ्यातील महुडे खुर्द, माळेवाडी व ब्राम्हणघर हिमा येथील १२४ गरजू व महिलांना स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान सासवड यांच्यावतीने अन्नधान्य किट व कपड्यांचे वाटप रविवारी (ता. २३) करण्यात आले.
या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे संतोष जगताप व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अनिल गोळे, सुदाम बांदल यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत महुडे खुर्द येथे ४१, माळेवाडी येथे ४०, तर ब्राह्मणघर येथे ४३ गरजूंना अन्नधान्य किट, कपडे व ब्लॅंकेट वाटप केले. यामध्ये एकल महिला, निराधार महिला व गरजू महिलांचा समावेश प्राधान्याने करण्यात आला होता. यावेळी महुडे खुर्द ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, तसेच तरुण वर्गासह ज्येष्ठ उपस्थित होते. गरजूंनी मिळालेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले.

02823

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.