Bangladesh-Pakistan : आधी फक्त डिवचायचे पण आता बांग्लादेश करतोय भारताला दुखावणारी मोठी चूक
admin November 28, 2025 05:24 PM
[ad_1]

शेख हसीना सत्तेवरुन पायउतार होताच मागच्या वर्षीपासून बांग्लादेश आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला सुरुवात झाली. आता दोन्ही देशांमधील सैन्य संबंध सुद्धा बळकट होत चालले आहेत. पाकिस्तानचं सैन्य प्रतिनिधी मंडळ सतत बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यात नवीन अध्याय लिहिला जात आहे. Heavy Industries Taxila (HIT) लेफ्टनेंट जनरल शाकिर उल्लाह खत्तक हे रविवारी बांग्लादेश दौऱ्यावर गेले. त्यावरुन बांग्लादेश पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करणार या शक्यतेला अजून बळ मिळालं आहे.

रविवारी ढाका येथे बांग्लादेशचे आर्मी चीफ जनरल वेकर-उज-जमां आणि पाकिस्तानी संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या वरिष्ठ प्रतिनिधींमध्ये महत्वाची बैठक झाली. रणगाडे, चिलखती वाहनं, APCs असॉल्ट रायफल आणि सैन्य वाहन बनवणारी HIT ही पाकिस्तानी कंपनी बांग्लादेशसाठी नवीन सप्लायर म्हणून समोर आली आहे. मागच्या एक महिन्यातील पाकिस्तानचा हा दुसरा हाय-प्रोफाइल सैन्य दौरा होता. बांग्लादेशला HIT कडून रणगाडे (Main Battle Tanks), Armoured Personnel Carriers (APCs), चिलखती फायटरं वाहनं, असॉल्ट रायफल आणि छोटी शस्त्र विकत घ्यायची आहेत.

भारत विरोधी वक्तव्य करुन आधीच वाद निर्माण केला

अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांच्यावर, सैन्य विषयात ते पाकिस्तानच समर्थन असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप होत आहे. काही सेवानिवृत्त बांग्लादेशी सैन्य अधिकारी जे कट्टरपंथी विचारधारेसाठी ओळखले जातात, ते पाकिस्तानसोबत संबंध पुनर्जीवित करण्याचा युक्तीवाद करत आहेत. रिटायर्ड मेजर जनरल फजलुर रहमान यांनी भारत विरोधी वक्तव्य करुन आधीच वाद निर्माण केला आहे. याच गटाच्या सल्ल्याने बांग्लादेशने मागच्या दोन महिन्यात पाकिस्तानसोबत सैन्य सहकार्य वाढवलं आहे.

दोन्ही आघाड्यांवर तयार रहावं लागेल

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि बांग्लादेश अशा संरक्षण करारावर चर्चा करतायत, जे पाकिस्तान-सौदी अरेबिया न्यूक्लियर शील्ड मॉडल सारखा असू शकतं. असं असेल तर भारताला भविष्यात पश्चिम आणि पूर्व दोन्ही आघाड्यांवर तयार रहावं लागेल. भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या इनपुटनुसार, ISI चे अधिकारी अलीकडेच बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाचा भाग होते. कट्टरपंथी बांग्लादेशी अधिकारी आणि संघटनांसोबत त्यांच्या गुप्त बैठका झाल्या.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.