Local Body Election: कोकणात काँग्रेसला खिंडार तर बीडमध्ये शरद पवार यांना धक्का; मतदानाला चार दिवस बाकी असतानाच राज्यात घडामोडींना वेग
admin November 28, 2025 05:24 PM
[ad_1]

Congress-Sharad Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50 आरक्षणाची मर्यादा न ओलांडता आणि याविषयीच्या याचिकांच्या निकालाधीन राहून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी वेळ वाढवून दिला. दरम्यान रणधुमाळीला वेग आला असतानाच अनेक पक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यात कोकणात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तर बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये फूट

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात चिपळूण काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.दुसरीकडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे यांच्यासोबत त्यांचा थेट संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे दोन गट सक्रिय झाल्याने पक्षांतर्गत तणाव चांगलाच वाढला आहे.या घडामोडींमुळे चिपळूणच्या निवडणूक मैदानात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसची लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे.

लियाकत शहा हे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार होते. त्यांचा नामनिर्देशन फॉर्म बाद झाल्याने ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांच्या विरोधातील भूमिकेमुळे कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. लियाकत शहा यांच्या मागे काँग्रेसचा आणि नगरसेवकांचा एक मोठा गट असल्याचा त्यांचा दावा आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे; मला उमेदवारी देताना चुकीची वागणूक मिळाली, असा आरोप शहांनी केला आहे. काँग्रेसने सुधीर शिंदे यांना शिंदे गटातून आणून, दोन लोकांना एबी फॉर्म दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तर पूर्वी शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. ते न मिळाल्याने काँग्रेसकडून मिळालेली संधी स्वीकारली, असे काँग्रेसचे उमेदवार सुधीर शिंदे म्हणाले.

परळीत शरद पवार गटाला झटका

परळीत भगवान सेनेचे सेनापती आणि शरद पवार गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश केला. गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे आपल्यासमोर पर्याय नव्हता. आता एकनाथ शिंदे हेच खरे नेते आहेत. त्यामुळे आपण शिंदे सेनेत गेल्याचे कराड यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. मात्र आता खालची फळी राहिली नाही. पक्षात खालच्या फळीमध्ये काम करत असताना माझी कुचंबणा होत होती. विधानसभेला मला तिकीट मिळाले नाहीतर मी पक्ष सोडला नाही. पण नंतरच्या पक्षाच्या नियुक्तीत मला डावलण्यात आले. इकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मला विचारणा झाली नाही. मग मी आता किती दिवस घरी बसायचं असा सवाल कराड यांनी केला. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाग घेणार चार दिवसात युतीचा प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले.


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.