Bollywood Actress on Domestic Violence : झगमगत्या विश्वात बाहेरुन सर्वकाही आकर्षक आणि ग्लॅमरस वाटतं… पण दिसतं तसं नतसं… असं म्हणतात… ते खरं आहे… बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर प्रेक्षकांचं करतात पण त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहो कोणाला माहिती नसतं… पण अनेक वर्षांनंतर सर्वकाही समोर येतं आणि अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील वास्तव समोर येतं… आता देखील असंच काही झालं आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, परपुरुषासोबत झोपण्यासाठी देखील तिच्यावर दबाव टाकला… लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याचं वास्तव समोर आलं आहे.
पतीने अभिनेत्रीवर लैंगिक दबाव, धमक्या आणि मानसिक छळासह अनुचित आणि अपमानास्पद वर्तन केलं… ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सेलिना जेटली आहे. याप्रकरणी सलिना हिने कायद्याची मदत देखील घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, सेलिना जेटली हिने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि छेडछाडीच्या आरोपाखाली खटला दाखल केला आहे.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, तक्रारीत अनेक गंभीर दावे केले आहेत. सेलिना हिने 2010 मध्ये ऑस्ट्रियन उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक पीटर हागशी लग्न केलं त्यांना तीन मुले आहेत, विन्स्टन आणि विराज आणि आर्थर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.
तक्रारीत म्हटल्यानुसार, सेलिना हिने पीटरचं वर्णन असंवेदनशील आणि स्वार्थी असं केलं. तिचा आरोप आहे की त्याचा राग आणि मद्यपानामुळे त्यांचं वैवाहिक जीवन कठीण झालं होतं. कागदपत्रांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, तो तिच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊ इच्छित होता.
सेलिना हिच्या आरोपांनुसार, इटलीमध्ये हनीमून दरम्यान , जेव्हा तिने आरोग्याच्या समस्यांबद्दल सांगितलं, तेव्हा पीटर रागावला, तिच्यावर ओरडला आणि भिंतीवर काचेचा ग्लास फेकला. अभिनेत्रीने सांगितलं की, तिला मासिक पाळीच्या क्रॅम्पचा त्रास होत होता.
तक्रारीत असं म्हटलं आहे की, पीटरने तिचे खाजगी फोटो काढले आणि नंतर तिने त्याच्या मागण्या पूर्ण न केल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
सेलिना हिने म्हटल्यानुसार, पीटर अभिनेत्रीवर काही अनैसर्गिक लैंगिक संबंधांसाठी दबाव आणत असे, ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटत असे.
सेलिना जेटलीचे सर्व आरोप कायदेशीर कागदपत्रांमध्ये दाखल केलेले आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. पीटर हाग याच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.