डोनल बिष्ट टीव्हीवरची एक मोठी अभिनेत्री आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. डोनलबद्दल अशी एक बातमी आलेली की, तिने बिग बॉस 19 फेम अभिषेक बजाजला डेट केलय. अभिषेक विवाहित असताना डोनल त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती,असं सुद्धा बोललं जायचं.
रिलेशनशिपच्या या चर्चांवर सोनल आता व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टावर एक मोठी पोस्ट करुन खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे. डोनलने कोणाचंही नाव न घेता लिहिलं की, मी शूट मध्ये बिझी असल्यामुळे यावर रिएक्ट करु शकले नव्हते. पण आता सांगिन की,कुठल्याही बेकार गोष्टींमध्ये माझं नाव ओढू नका.
जर, तु्म्हाला सत्य माहित नाही तर काही कमेंट करु नका. खोट्या अफवा पसरवू नका. मी सहन करणार नाही. कुठलाही खोटा आरोप केला तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल. लोक तुमचा किंवा तुमच्या नावाचा छोट्या-मोठ्या फायद्यासाठी वापर करतात. याला मी कंटाळली आहे.
मी अनेक वर्ष मेहनत करुन कामाने आपलं नाव बनवलं आहे. मी एका चांगल्या घरातील, इज्जतदार मुलगी आहे. मी इथे काम करायला आली आहे. कोणा दुसऱ्याच्या आयुष्यातील ड्राम्याचा भाग बनायला नाही.
डोनल बिष्टने आपल्या पोस्टमध्ये कोणाचं नाव मेंशन केलेलं नाही. पण फॅन्सच म्हणणं आहे की, अभिषेक बजाज सोबत रिलेशनशिपच्या अफवा उडाल्या त्यावर तिने रिएक्ट केलय.