बॉलीवूडचे मोस्ट पॉप्युलर कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 15 जुलैला आई-बाबा झाले. त्यांना कन्यारत्न झाले आहे. आता तब्ब्ल साडेचार महिन्यानंतर जोडप्याने आपल्या मुलीची पहिली झलक पोस्ट करत तिचे नावही जाहीर केले आहे.
कियारा अडवाणीने आपले सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी चिमुकल्या लेकीचे पाय हातात घेतले आहेत. हा सुंदर फोटो पोस्ट करून सिद्धार्थ व कियाराने तिचं नाव जाहिर केलं. त्या फोटोसोबत आमच्या राजकुमारीसाठी परमेश्वराकडे सदैव प्रार्थना आणि आमचे आशीर्वाद असतील. ‘सरायाह’ मल्होत्रा असे लिहीले आहे.
सिद्धार्थ आणि कियाराने मुलीचे नाव जाहीर केल्यानंतर इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींसह चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये करण जोहर, वरुण धवन, मनीष मल्होत्रा यांनी हार्टचे इमोजी देत कमेण्ट्स केल्या आहेत.








