तपोवन येथील वृक्षतोडीचं समर्थन करताना भाजप नेते नितेश राणे यांनी अजब युक्तीवाद केला आहे. तपोवनातील वृक्षांची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का बसतात असा सवाल उपस्थित केला होता. याच वक्तव्यावर आता मनसेच्या अखिलेश चित्रे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? असा सवाल करत त्यांनी राणेंना डिवचलं आहे.
Navale Bridge : नवले ब्रीज अपघात टाळण्यासाठी पोलिसांची आणखी एक नवीन उपाय योजनानवले ब्रीज परिसरातील अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची आणखी एक नवीन उपाय योजना करण्यात आली आहे. ती म्हणजे आता कात्रज बायपास मार्गावर वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक करण्याक आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी राजीनामा द्यावा, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षांची मागणीकामठीमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपने व्होट चोरी आणि गैरप्रकार केल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन एकता मंचने केला आहे. तर या गैरकारभाराला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी केली आहे.