सूर्योदय जसा नवी दिशा, नवी उमेद घेऊन येतो. त्याचप्रमाणे सूर्यास्त देखील अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेचा काळ असतो, ज्याला आपण दिवेलागणीची वेळ म्हणतो. तिन्हीसांजेवेळी लक्ष्मी देवी घरात येते अशी मान्यता आहे. त्यामुळे यावेळी काही कामे करणे शुभ मानली जातात. असे म्हणतात की, या कामांमुळे लक्ष्मी देवीचे घरी आगमन होते आणि तिच्या कृपादृष्टी सदैव कुटूंबावर राहते. आज आपण सूर्यास्तावेळी कोणत्या गोष्टी करायल्या हव्यात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
तुळशीजवळ दिवा –
सूर्यास्तावेळी तिन्ही सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. यामुळे लक्ष्मी देवीचे मनोभावे स्मरण करावे आणि तिचे आभार मानावेत.
देवीचे पूजन –
संध्याकाळी लक्ष्मी देवीचे स्मरण करावे, पुजा करावी. असे केल्याने तिची कृपादृष्टी तर राहतेच आणि पुण्यही मिळते.
हेही वाचा – पूजेसाठी VSSU तिस्तु तिस: घराची पूजा करताना, तो आहे
शांतता –
भारतीय परंपरेत मौनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तिन्हीसांजेला मौन धारण करावे, असे करणे शुभ मानले जाते.
पूर्वजांचे स्मरण –
दिवेलागणीला पूर्वजांचे स्मरण करावे. तुम्ही एक दिवा त्यांना अर्पण करू शकता.
लक्ष्मीचा मंत्र –
तुम्ही 'ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः किंवा 'श्री सूक्त' यमुले देवीचि कृपा मिलेल.
(टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.)
हेही वाचा – Broken Gods Idol : देवाच्या खंडित मूर्ती, फोटो यांचे काय करावे?