स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न मोडल्यावर तो धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, लोकांमध्ये प्रचंड संताप, थेट…
Tv9 Marathi December 12, 2025 06:45 PM

भारताची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. संगीतकार पलाश मुच्छल याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाला काही तास शिल्लक असताना असे काही घडले की, थेट तिच्या लग्नाची तारीखच पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. लग्नाला आलेले पाहुणे उपाशीपोटी परत गेले. त्यावेळी वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याचे कारण देण्यात आले. मात्र, स्मृती मानधना हिने 7 डिसेंबर रोजी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने लग्न रद्द केल्याचे सांगितले. पलाश मुच्छल याने स्मृती मानधनाला धोका दिल्यानेच तिने लग्न रद्द केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, यावर फार काही भाष्य दोन्ही कुटुंब करत नाहीत. स्मृती मानधना आणि पलाश यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले.

स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नातील मेहंदी, संगीत आणि हळदीचे व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसली, त्यामध्ये पलाश आणि स्मृती मानधना धमाल करत होते. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न रद्द झाल्यानंतर इन्फ्लुएन्सर अश्वनीर ग्रोव्हरने धक्कादायक विधान केले. अश्वनीर  ग्रोव्हरने अभिनेते राजेश यादव आणि संयम शर्मा यांच्यासोबत मिळून यावर एक व्हिडिओ बनवला. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न मोडल्यावरून ते बॉलिवूडच्या स्टारबद्दल या व्हिडीओत हैराण करणारी विधाने करण्यात आली.

स्मृती मानधना-पलाशचे रद्द झालेले लग्न, सेलिब्रिटींनी भरलेल्या लग्नांच्या ट्रेंडवर टार्गेट करत त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांच्या व्हायरल क्लिपमध्ये संयमने आपल्या मुलीच्या तिसऱ्या लग्नाची तयारी करणाऱ्या एका ग्राहकाची भूमिका साकारली. जेव्हा राजेशने खर्चाच्या मर्यादेबद्दल सहजपणे विचारले, अशनीरने त्याला थांबवले, दुसऱ्या भेटीची आठवण करून दिली आणि संयमला त्याचे काल्पनिक बजेट आणखी वाढवण्यासाठी सांगितले.  संयमने ती रक्कम दोन हजार कोटींपर्यंत वाढवली.

View this post on Instagram

A post shared by Rrajesh Yadav (@rrajeshyadav05)

तुम्ही कोणाच्यातरी शिफारशीने आला आहात, म्हणून आम्ही हे करू…  मग अवास्तव मागण्या सुरू… स्थळासाठी, अश्नीर आणि राजेशने उदयपूरचे नाव सुचवले. राजेशने मजेत विचारले, OYO?” त्यावर संयमने प्रत्युत्तर दिले, “रितेश स्वतः चाव्या द्यायला येणार आहे का?.. अशाप्रकारचा एक व्हिडीओ तिघांनी मिळून तयार केला आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओनंतर लोक त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड स्टारसोबतच पलाश आणि स्मृती मानधनाच्या लग्नालाही टार्गेट करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.