टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात 51 धावांनी पराभव झाला. 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीमचा डाव 162 रन्सवर आटोपला. बॅटिंग ऑर्डरशी सतत होणारे प्रयोग हे पराभवाचं एक कारण आहे. यामागे हेड कोच गौतम गंभीर आहेत. ते बॅटिंग पोजीशनला ओवररेटेड मानतात. गौतम गंभीर यांनी अलीकडेच व्हाइट बॉल क्रिकेटवर मोठं स्टेटमेंट केलं होतं. गंभीर यांनी व्हाइट बॉल क्रिकेटला ओवररेरेटड म्हटलं होतं. गौतम गंभीर आतापर्यंत अनेकदा बोलले आहेत की, ओपनर्सनला सोडून प्रत्येक फलंदाजाला कुठल्याही क्रमांकावर खेळ्ण्यासाठी तयार असलं पाहिजे. या मॅचमध्ये सुद्धा हेच दिसून आलं. त्यामुळे टीम इंडिया बुडाली.
गौतम गंभीरयांच्या अशा विचारसरणीचा थेट परिणाम मॅचवर दिसून आला. तो पूर्णपणे निगेटिव होता. पुन्हा एकदा सतत फ्लॉप असलेल्या शुबमन गिलला ओपनिंगला पाठवलं. परिणामी तो शुन्यावर आऊट झाला. त्यानंतर टीमला एका इनफॉर्म फलंदाजीची आवश्यकता होती. अक्षर पटेलला नंबर 3 वर पाठवलं. तो सामान्यत: लोअर ऑर्डरमध्ये खेळतो. दबावाखाली तो 21 चेंडूत 21 धावा करुन बाद झाला. त्यामुळे रन चेजच्या बाबतीत टीम इंडिया मागे पडली.
पण तो पर्यंत उशीर झालेला
नियमित तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा सूर्यकुमार यादव चौथ्या नंबरवर येऊ लागल्यापासून त्याची सुद्धा लय बिघडली आहे. या मॅचमध्ये त्याने फक्त 5 धावा केल्या. पहिल्या सामन्यात तिसऱ्या नंबरवर खेळणारा तिलक वर्मा दुसऱ्या सामन्यात पाचव्या नंबरवर फलंदाजीला आला. तो 62 धावांची झुंजार इनिंग खेळला. पण तो पर्यंत उशीर झालेला. तिलक वरती आला असता, तर कदाचित इतका दबाव जाणवला नसता. दुसरीकडे स्फोटक फलंदाज शिवम दुबेला आठव्या नंबरवर पाठवलं. त्याने फक्त 1 रन्स केला.
टीमला हे महाग पडू शकतं
बॅटिंग ऑर्डरमध्ये स्थिरता आणि आत्मविश्वास राहिलेला नाही. प्रत्येक फलंदाज एका नवीन पोजिशनवर खेळत होता. त्यामुळे एकही फलंदाज आपली नैसर्गिक फलंदाजी करु शकला नाही. पावरप्लेमध्ये विकेट गेल्यानंतर एकाही सेट फलंदाजाला वरती पाठवलं नाही. त्यामुळे रनरेट वाढत गेला. दुसऱ्याबाजूला विकेट पडत होत्या. हा प्रयोग फक्त एका मॅचपुरता मर्यादीत नाही. मागच्या काही सामन्यांपासून गिलला ओपनिंग, तिलकला 3-4-5, हार्दिकला 5-6-7 आणि दुबेला 7-8 नंबरवर फिरवलं जात आहे. परिणामी टीम मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळतेय. 2026 मध्ये होणारा टी 20 वर्ल्ड कप जवळ आलाय. प्रत्येक खेळाडूला त्याची मजबूत पोजीशन दिली नाही, भूमिका स्पष्ट नसेल, तर अनिश्चित काळासाठी टीमला हे महाग पडू शकतं.