'आमचं प्रेम खरं होतं' धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी रडल्या, म्हणाल्या...'त्याचं 'ते' स्वप्न अपूर्णच राहिलं'
esakal December 13, 2025 12:45 AM

Dharmendra’s Passing Still Hurts : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. निधनापूर्वी त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती. देओल कुटुंबियांनी त्यांच्या राहत्या घरी शोकसभेचं आयोजन केलं होतं. परंतु त्या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली उपस्थित नव्हत्या.

त्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी नवी दिल्लीत एका शोकसभेचं आयोजन केलं. या शोकसभेत मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान या शोकसभेत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झालेल्या पहायला मिळाल्या. यावेळी त्या धर्मेंद्र यांची आठवण काढून रडल्या.

त्या म्हणाल्या...'मला कधीच वाटलं नव्हतं की, असा क्षण येईल की, मला धरमजींसाठी शोकसभा आयोजित करावी लागेल. हे माझ्यासाठी खरंच खुप वाईट आहे. धरमजींचं व्यक्तिमत्त्व फार मोठं होतं. त्यांनी स्वत:ला कधीच इतरांपेक्षा वेगळं समजलं नाही. हाच त्यांचा गुणं प्रत्येकाला आपलंसं करणारा होता. गरीब असो किंवा श्रीमंत धर्मेंद्र प्रत्येकांसोबत प्रेमाने आदराने राहायचे, वागायचे.'

पुढे बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, 'त्यांनी आजपर्यंत अनेक सिनेमे केले. मी त्यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. नंतर ते माझे जीवनसाथी झाले. आमचं एकमेकांवर खरं प्रेमहोत म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र प्रत्येक्ष क्षणी माझ्यासोबत उभे होते. त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझी साथ दिली. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे.'

View this post on Instagram

'धर्मेंद्र शेवटच्या काळात उर्दुमध्ये शेरोशायरी करायचे. त्या त्या परिस्थितीनुसार त्यांची शायरी तयार असायची. धर्मेंद्र यांची ती आवड पाहून त्यांना कविता, शायरींचं पुस्तक प्रकाशित करण्याचा सल्ला दिला. परंतु ते स्वप्न पुर्ण होण्यापूर्वींच त्यांचं निधन झालं.

जुन्या गाण्याची मेजवानी! अमिताभ यांच्या ‘शराबी’चा म्युझिकल अवतार! रंगमंचावर पुन्हा जिवंत होणार बप्पीदा यांची जादू!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.