अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. 80 ते 90 च्या दशकातील असे काही सिनेमे आहेत जे आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अमिताभ यांचा शोले, शराबी, कुली, डॉन, शराबी सारखे सिनेमे आणि त्यातील गाणी आज देखील तितकीच आवडीने ऐकली जातात.
अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि ओमप्रकाश यांच्या प्रमुख भूमिकेतील 'शराबी' हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते. संगीतकार बाणी लाहिरीच्या अजरामर संगीतामुळे आणि कलाकारांमुळे हा चित्रपट-गाणी आजही लोकप्रिय आहे.
नुकतंच कनीज है म्युझिकल नाटक सादर करणारे दिग्दर्शक रणधीर रंजन राय आता या कल्ट चित्रपटाला रंगमंधानर आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे, रणधीर रंजन रॉय यांची शराबीला म्युझिकल नाटकाच्या रूपात सादर करण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. बाणी लाहिरीच्या निधनानंतर हा प्रकल्प थांबवला होता. कारण त्यांना मूळ संगीताचा सन्मान राखूनच है नाटक करायचे होते.
आता मात्र ते पुन्हा हा प्रकल्प करण्याच्या तयारीत आहे. दे दे प्यार दे, इंतेहा हो गई, मुड़ी नौलखा मंगता दे या गाजणाऱ्या गाण्यांचा हक्क विकत घेण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती मिळते. याआधी त्यांनी गायक लकी अली यांच्यासोबत काम करून पड़ोसनचे नवे रूप करण्याचीही इच्छा व्यक्त केली होती, परंतु कॉपीराइट अडचणीमुळे ते शक्य झाले नव्हते.
अक्षय खन्ना की रणवीर सिंह! कोणाकडे जास्त संपत्ती? एकाकडे मोठी हवेली तर दुसऱ्याकडे तगडा बँक बॅलेन्स