भुवनेश्वर : ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हाती घेतलेल्या या कामामुळे १२० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच गर्भगृहातून वाळू काढली जाणार आहे.
मंदिर कोसळण्याचा धोका असल्याने त्याला आधार देण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांनी १९०३ मध्ये तेथे वाळू भरली होती. या घटनेनंतर १२० वर्षांनंतर गर्भगृहातील वाळू काढण्याचा निर्णय ‘एआयएस’ने घेतल्याने इतकी वर्षे बंद असलेल्या त्या कक्षात प्रवेश करण्याचा प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहाच्या आतील वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले असल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले.
Wani Bus Stand : सिंहस्थ कुंभमेळा: सप्तशृंगगड मार्गावरील वणी बसस्थानकाचे रुपडे पालटणार; नूतनीकरणासाठी 1.65 कोटी मंजूर ड्रिलिंग प्रक्रिया सुरळितअधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात दाबून बसलेल्या वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले आहे. प्राथमिक मोजमापांनुसार गर्भगृहाची भिंत सुमारे आठ मीटर जाड आहे. सूर्य मंदिराची एकूण उंची सुमारे १२७ फूट आहे. पश्चिमेकडे जमिनीपासून सुमारे ८० फूट उंचीवर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत काढण्यात आलेल्या साहित्यामध्ये वाळू आणि दगडाचे तुकडे आहेत. हे सर्व नमुने आता वैज्ञानिक विश्लेषणासाठी गोळा करण्यात येत आहेत. ‘एएसआय’च्या प्रारंभिक अहवालांनुसार वाळूने भरलेल्या कक्षात आद्रता आहे. यामुळेच आतल्या भागाची झीज होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची चिंता व्यक्त होत होती.
गर्भगृहातील माती काढताना मंदिराची हानी होऊ नये, यासाठी दहा सदस्यांच्या तज्ज्ञ पथकाकडून डायमंड-ड्रिल तंत्रज्ञान आणि कंपनविरहित यंत्रणा यांचा वापर करून खोलवर ड्रिलिंग केले जात आहे. मंदिराच्या नाजूक खोंडालाइट दगडांच्या रचनेला कोणताही धक्का बसू नये यासाठी सुरक्षेचे उपाय केले जात आहेत. ड्रिलिंगचे ठिकाण ‘जगमोहन’ (सभा मंडप)च्या पश्चिमेकडील भागात, पहिल्या आणि दुसऱ्या स्तरादरम्यान निश्चित केलेले आहे. तेथून पुढे वाळू बाहेर काढण्यासाठी नियोजित बोगद्याची उभारणी केली जाणार आहे.
ब्रिटिश प्रशासनाने १९०३ मध्ये अभियंता बिशन स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भगृहात वाळू आणि दगड भरले होते. बंगालचे तत्कालीन नायब राज्यपाल जे. ए. बोर्डिलॉन यांनी मंदिर कोसळण्याची भीती व्यक्त करत तातडीची उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली होती. सलग तीन वर्षे काम करीत कामगारांनी १२८ फूट उंच संरचनेत वरून आणि बाजूंनी वाळू ओतली आणि सर्व प्रवेशद्वार बंद केले. यामुळे सभागृहाचे रूपांतर दगडाची खोलीत झाले होते.
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा सुरक्षा: आपत्ती निवारणासाठी २६४ कोटींचा मेगा आराखडा तयारअशी आहे प्रक्रिया
कोणार्क सूर्य मंदिरात १२० वर्षांनंतर ऐतिहासिक वाळू काढण्याच्या कामाला सुरुवात
मंदिर कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी ब्रिटिशांनी १९०३ मध्ये गर्भगृहात वाळू भरली होती
ड्रिलिंगद्वारो मूळ वाळूच्या थरापर्यंत पोहोचण्यात यश
- गर्भगृहाभोवतीची भिंत तब्बल आठ मीटर जाड असल्याचे स्पष्ट
आतल्या वाळूमध्ये आर्द्रता आढळल्याने संवर्धनाबाबत चिंता
नाजूक शिल्पकलेचे संरक्षण करण्यासाठी कंपनविरहित डायमंड ड्रिलिंग तंत्राचा वापर
नियंत्रित पद्धतीने वाळू बाहेर काढण्यासाठी विशेष बोगदा तयार करण्याचे उद्दिष्ट