Maharashtra Live News Update: पुणे -मनमाड-इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी; 4 तासापासून वाहने एकाच जागेवर
Saam TV December 13, 2025 03:45 PM
PMC Election: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे युती होणार?

उद्या दोन्ही पक्षाची एकत्र "अनौपचारिक" बैठक

पुणे शहर शिवसेना भवन येथे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांचा एकत्रित "चहापान"

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि मनसे चे मुख्य पदाधिकारी यांचा एकत्रित "चहापान"

पुणे पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता

Nashik: आंध्रप्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनर देखील नाशिकमध्ये दाखल

* दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल, कालपासून ६०० झाडं नाशिकमध्ये पोहचली

* नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू

* मखमलाबादच्या भोईर मळा परिसरात झाडांसाठी खड्डे खोदण्याचं काम सुरू

* तब्बल 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार

* 15 फुटांपेक्षा उंच देशी झाडं नाशकात दाखल

* वड,पिंपळ, निंब, यासह देशी झाडं दखल..

* गिरीश महाजन आणि सामाजिक संस्था, संघटनांच्या उपस्थितीत सोमवारी होणार वृक्ष लागवड कार्यक्रम

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप लागली कामाला

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू झालीय. गेल्या ४ दिवसात २००० इच्छुकांनी अर्ज घेतले असून आजपासून भाजप कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. पुणे भाजप चे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महानगर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्याकडे आज इच्छुक उमेदवार मुलाखती देत आहेत. हे सगळी नावं भाजप शहर कडून प्रदेशाला पाठवले जातील आणि त्यानंतरच तिकीट वाटप होईल अशी माहिती यावेळी देण्यात येतील.

Pune: पुणे -मनमाड-इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी; 4 तासापासून वाहने एकाच जागेवर

मालेगावच्या चोंडी घाटा जवळ दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक झाली ठप्प..

सुमारे 10 किमी पर्यत वाहनाची लागली रांग..वाहनधारकांसह इतर वाहना मध्ये अडकलेले प्रवासी झाले होते त्रस्त

घाटातील अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात यश

त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश..

वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनांच्या मात्र लांब रांगा

pune: पुण्यात भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी

आज इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती

पुणे शहर भाजप कार्यालयात मोठी गर्दी

केडीएमसी प्रभाग रचना व आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. १२२ नगरसेवकांसाठी ३१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या आरक्षण सोडतीवर गंभीर आक्षेप घेत शिंदे शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.रवी पाटील यांचा दावा आहे की, प्रभाग क्रमांक ३, ५ आणि १५ मध्ये नियमबाह्य पद्धतीने आरक्षण लावण्यात आले आहे. काही प्रभागांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी अशी तिन्ही आरक्षणे एकाच वेळी टाकण्यात आली असून, ही प्रक्रिया जनसंख्येनुसार नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आमचा निवडणुकीला विरोध नाही, मात्र नगरविकास विभागाने काढलेल्या जीआरनुसार जी प्रक्रिया अपेक्षित होती, ती राबवली गेलेली नाही. समान संधीचा दावा करणारा निवडणूक आयोग एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पुरुष आणि महिला उमेदवारांवर अन्याय होत आहे.

"दो भाई, दोनो तबाही", गुन्हेगारी प्रवृत्त रिल्स तयार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची "मुंडन" कारवाई

सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या किंवा चक्क शिवीगाळ करून दहशत पसरवणाऱ्या रिल्स अपलोड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. पुण्यातील खडकी भागात २ तरुणांनी येरवडा जेल, दो भाई, दोनो तबाही, जिंदगी खराब करून टाकेल अशा प्रकारच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओ मधून गुन्हेगारी प्रवृत्त करणारे वाक्य असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओ बद्दल माहिती मिळताच खडकी पोलिसांना या तरुणांचा शोध घेण्याचं ठरवलं आणि अखेर ते दोघे सापडले. खडकी पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेतलं त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेरा समोर माफी मागायला लावली. पुणे पोलिसांकडून सध्या अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे..

तो आला त्याने पाहिले आणि तो परत फिरला..

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याचे प्रमाण वाढले असून बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने ठीक ठिकाणी पिंजरे लावले आहेत मात्र बिबट्याची काही कमी नाहीत वन विभागाच्या पिंजऱ्या जवळ येऊन पुन्हा माघारी फिरणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ वन विभागाच्या ट्रँप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे...

पारनेर तालुक्यातील किन्ही येथील ढाकऱ्या तलाव परिसरात देखील वन विभागाने पिंजरा लावलेला आहे.या पिंजऱ्याच्या समोर येऊन बिबट्या पिंजऱ्यात न जाताच माघारी परतला असल्याचे दृष्य वन विभागाने लावलेल्या ट्रँप कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा

गोलीत केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय अंतर्गत कापसाची खरेदी करण्यात येत आहे मात्र कापूस घेऊन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतातील कापूस वाहनात भरून सीसीआय खरेदी केंद्रावर दाखल झाले आहेत मात्र सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालकांकडून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच क्विंटल 20 किलो कापसाची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान आमच्या शेतात एक एकर कापूस शेतीमध्ये पाच क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन झाल्याने हा कापूस कुठे विक्री करावा असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकरी सरकारला विचारत आहेत.

धुळ्यात थंडीचा जोर कायम

सलग दुसऱ्या दिवशी धुळ्यामध्ये 6.1° c तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तापमानामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी देखील भरली आहे,

गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट जाणवत असल्याचे दिसून येत आहे, सातत्याने तापमानामध्ये घट होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता धुळेकरांवर होताना दिसून येत आहे, सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना गरम व उदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे, पुढील काही दिवस तापमानामध्ये अशाच प्रकारे घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी काल सात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सात साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या घोषणेची ही पूर्वतयारी असून, सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल बाजणार, असेच स्पष्ट होत आहे. दरम्यान काल महापालिका अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणांची पाहणी केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या पाहणीनंतर ती ठिकाणे अंतिम केली जाणार आहेत. त्याचदिवशी अंतिम मतदारयादीही प्रसिद्ध केली जाईल.महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी आयोगाकडून तयारी सुरू केली आहे. त्यातून निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले होते. त्याप्रमाणे काल सात अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर सहाय्यक अधिकाऱ्यांमध्ये नायब तहसीलदार आणि निवासी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. चार सदस्यांच्या प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी असेल, तर पाच सदस्यीय आणि चार सदस्यांच्या एका प्रभागासाठी स्वतंत्र निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी असेल. प्रारूप मतदार यादीतील हरकतींवर निर्णय घेऊन सोमवारी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रे ही निश्चित करण्यात येणार आहेत.

'नागपुरातील उद्याच्या संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांची राष्ट्रवादी राहणार अनुपस्थित.

नागपुरात संघाने आयोजित केलेल्या उद्याच्या बौद्धिकाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही. संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची, आमदार अमोल मिटकरी यांची 'साम'शी बोलतांना प्रतिक्रिया. मागच्या वर्षीही संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुणीही राहिलं नव्हतं उपस्थित. यावेळी 'साम'शी बोलतांना अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू -फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा असल्याचे म्हटलं. संघाकडून उद्याच्या बौद्धिकचं महायुतीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना निमंत्रण. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बौद्धिकाला उपस्थित राहण्याची शक्यता.

भाजपकडून १६ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित...

वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या १६ बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी या सर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.

या निलंबित सदस्यांमध्ये जिल्हा चिटणीस करूणा कल्ले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष वैभव उलेमाले, सदस्य राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, वाशिम शहर उपाध्यक्ष संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, उत्तर आघाडी प्रकोष्ठाचे सावंतसिंग ठाकूर, 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' सेलचे प्रमुख सचिन पेंढारकर, महिला शहर उपाध्यक्ष अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांचा समावेश आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे.

महिला शिवसैनिकांचा भाजपात पक्षप्रवेश

भाईंदराच्या खारेगाव परिसरातील महिला शिवसैनिकांनी आमदार नरेंद्र यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. माजी नगरसेविका प्रीती पाटील यांच्या कामावर विश्वर ठेऊन शेकडो महिला कार्यकर्त्यांनी हा भाजपात प्रवेश केला आहे.

महानगरपालिकेची निवडणुका जवळ आल्याने मीरा भाईंदर शहरात राजकीय हालचालींनी घेत घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांचे पदाधिकारी पक्षांतराच्या उड्या मारताना दिसत आहेत. काही पदा साठी तर काही नगर सेवकाच्या तिकीट साठी जात असल्याचे बोलले जात आहे.

nashik-malegaon-अवैध लॉटरी सेंटर पोलिसांचा छापा,पाच जण ताब्यात

नाशिकच्या मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात अवैध लॉटरी सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी खात्री करताच तेथे छापा मारत लॉटरी सेंटरच्या दोघा चालकांसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या क़डून रोख दोन लाख ७६ हजाराचा मुद्देमाल मिळाला असून पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आग, वैद्यकीय साहित्य जळून खाक

: लातूरच्या अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातल्या एका रूमला भीषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य जळून खाक झाले आहे, सुदैवाने या भीषण आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येतील, वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र ही आग नेमकी कशाने लागली याचा शोध सुरू आहे.

मनसेकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांना अर्ज वाटप आज पासून सुरु झालं आहे.मनसेच्या शहर कार्यालयात अर्ज घेण्यासाठी गर्दी झालीय.आज मनसेच्या शहर अध्यक्षकाकडून इच्छुकांना अर्ज वाटप सुरु करण्यात आली आहे.

इच्छुक उमदेवारांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. शिवसेना आणि मनसे युती झाली तर आम्ही युतीमध्ये लढण्यासाठी तयार आहोत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा- २०२५’ उत्तीर्ण परंतु व्याहवसायिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे २ हजार २०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज लातूर येथे होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काल वयाच्या 90 वर्षी अखेरचा श्वास घेतला, लातूरच्या देवघर येथील स्वघरी काल पहाटे त्यांचं निधन झालं, दरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज लातूरच्या वरवंटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, तर शिवराज पाटील चाकूरकर यांचे अंतदर्शन घेण्यासाठी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, राज्यसभाचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , शरदचंद्रजी पवार यांच्यासह इतर देशातील आणि राज्यातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

कुर्ला पूर्व एसटी बस डेपो नाल्याजवळ मृतदेह आढळला; पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

कुर्ला पूर्व येथील एसटी बस डेपोजवळील नाल्याजवळ एका पुरूषाचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी अधिकाऱ्यांना माहिती देताच, अग्निशमन विभाग आणि कुर्ला पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिसराची सुरक्षा करण्यात आली आहे आणि अधिकारी मृतदेह तिथे कसा आला याची तपासणी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

हदगाव EVM स्ट्रॉंग रूमला अभेद्य सुरक्षा कवच.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नगरपालिका कार्यालयातील EVM स्ट्रॉंग रूमला अभेद्य सुरक्षा कवच देण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास सीसीटीव्हीची नजर, सशस्त्र पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि डिटेक्टर मशीनद्वारे काटेकोर तपासणी अशी बहुअस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नाव नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध वातावरण दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य या मशीनमध्ये सुरक्षित मिळत आहे. 21 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची उलटी गणती सुरू झाली असून उमेदवारांची उत्सुकता आणि धाकधूक दोन्हीही वाढली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात अजित पवार गटाचा नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात थेट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्च्याचा आयोजन करण्यात आलं होतं

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अंदा गोंदी तसेच प्रशासनाकडून काम केली जात नाही येत चुकीच्या पद्धतीने कामांना मंजुरी देणे आणि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी काम केली जातात तसेच नवी मुंबईमध्ये काही माजी नगरसेवकांना कोटी कोटी रुपये कामे दिले जातात काही प्रभागांमध्ये दिली जात नाही असा आरोप नामदेव भगत यांनी पालिका प्रशासनावर केला आहे

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरातील कमाल अन् किमान वातावरण कमी झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.