लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व पुरवठा विभागातील लाचखोर अधिकारी गजानन अशोकराव देशमुख वय 36 वर्ष याला 16000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल आहे.
Live: फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाईचऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीर यांच्यासह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Live: साताऱ्यातील सावळी गावात मुंबई क्राईम बँचचा छापासाताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांचा छापा
तीन कारागीरांसह स्थानिक एक जण असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात
सावरी गावामध्ये एका शेडमध्ये एमडी ड्रग्स बनवत असल्याची प्राथमिक माहिती...
याआधी मुंबई येथे मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवत असल्याची मिळाली होती माहिती
ManmadLIVE UPDATE : मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत, स्टाँग रूम परिसरात जामर बसवण्याची मागणी करण्यासाठी नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण नाईक आणि शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व काँग्रेस उमेदवारांनी नगर पालिकेच्या प्रवेशद्वाराखाली उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून जामर बसवण्याची मागणी वारंवार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास रास्ता रोकोसारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Tukaram MundheLiveupdate : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधानभवनाकडे मोर्चाहिवाळी अधिवेशनात विधानभवनात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडून आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. हा मोर्चा विधानभवनाकडे जात असून काँग्रेस नेते बंटी शेळके या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचे सांगत काँग्रेसने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनाद्वारे सत्य बाहेर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Puneliveupdate : आयटी पार्क हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीहिंजवडी आयटी पार्क परिसरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. विनोदेनगर चौकातील एका खासगी शाळेने दोन ते तीन वेळा रस्ता अडवून पालकांची वाहने सोडली, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झालेली नसून १६ तारखेला पुढचे युक्तिवाद होतील.
Mumbai Live: दमानियांकडून अजित पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र टीकाअंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांप्रमाणे चूक झाली असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवार यांनी केलेली कृती ही साधी चूक नसून गंभीर स्वरूपाचा फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Nagpur Live: कृषी पणन व उत्पन्न विधेयकाला सत्ताधारी आमदाराचा विरोधअकोला: नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या सन २०२५ च्या विधेयक क्रमांक ९३ ला तीव्र विरोध दर्शवला. सरकारमध्ये सहभागी असतानाही शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचणाऱ्या कोणत्याही कायद्याला विरोध करणार असल्याची भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्ट केली.
Nashik Live: आंध्रप्रदेशातून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखलआंध्रप्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनरदेखील नाशिकमध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दखल झाली असून कालपासून ६०० झाडं नाशिकमध्ये पोहचली आहेत. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू आहे.
Nashik : आंध्र प्रदेशातून झाडांचा आणखी एक कंटेनर दाखलआंध्रप्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनर देखील नाशिकमध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल, कालपासून ६०० झाडं नाशिकमध्ये पोहचली आहेत. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू आहे. मखमलाबादच्या भोईर मळा परिसरात झाडांसाठी खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे. तब्बल 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार आहेत.
Nashik : पुणे-मनमाड-इंदूर मार्गावर वाहतूक ठप्प, ४ तासांपासून वाहनं एकाच जागीमालेगावच्या चोंडी घाटा जवळ दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक झाली ठप्प.. सुमारे 10 किमी पर्यत वाहनाची लागली रांग..वाहनधारकांसह इतर वाहना मध्ये अडकलेले प्रवासी झाले होते त्रस्त घाटातील अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात यश त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश.. वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनांच्या मात्र लांब रांगा
Dhule News : बुलेटला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यूधुळ्यात फागणे इथं एका अज्ञात वाहनानं बुलेटला धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. फागणे गावात असलेल्या शाळेजवळ हा अपघात झाला. यात दीपक मोतीलाल भामरे आणि पन्नालाल भगवानदास वर्मा यांचा मृत्यू झाला आहे. मृत दोघेही जळगावचे असल्याची माहिती समजते.
Nashik Live : निफाडमध्ये शेतकऱ्याच्या कांदा पिकावर तणनाशकाची फवारणी, पाच एकर पिक जळून खाकनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मौजे शिंपी टाकळी येथील शेतकरी श्री बाळकृष्ण कारभारी बोडके यांच्या पाच एकर कांदा रोपावर अज्ञात इसमाने टू फोर्टी तणनाशकाने फवारत कांदा रोप जाळून टाकले
- शेतकऱ्यांन मध्ये संतापाची लाट
- तोंडाशी आलेला पिक गेल्याने शेतकरी हवालदिल
Live : केडीएमसी प्रभाग आरक्षणावर आक्षेप, रवी पाटील यांची उच्च न्यायालयात याचिकाकेडीएमसीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेसाठी १२२ नगरसेवकांच्या निवडीसाठी ३१ प्रभागांची रचना करण्यात आली असून, ११ नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती. मात्र या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिंदे शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, प्रभाग क्रमांक ३, ५ आणि १५ मध्ये नियमबाह्य पद्धतीने आरक्षण लावण्यात आले आहे. काही प्रभागांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी अशी तिन्ही आरक्षणे एकाचवेळी देण्यात आली असून, ही पद्धत लोकसंख्येच्या निकषांनुसार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवडणुकीला विरोध नसून, नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जी प्रक्रिया अपेक्षित होती ती राबवली गेली नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे समान संधीचा दावा केला जात असताना दुसरीकडे पुरुष आणि महिला उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
Pune Live : गुन्हेगारी रिल्सवर पुणे पोलिसांचा दणका! ‘दो भाई, दोनो तबाही’ व्हिडिओप्रकरणी तरुणांवर कडक कारवाईसोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रिल्सवर पुणे पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. “दो भाई, दोनो तबाही”, “येरवडा जेल”, “जिंदगी खराब करून टाकेल” अशा आक्षेपार्ह आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या मजकुराचा वापर करत खडकी परिसरातील दोन तरुणांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. शिवीगाळ आणि दहशत निर्माण करणाऱ्या संवादामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
या व्हिडिओची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि संबंधित दोन्ही तरुणांना शोधून काढत ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मुंडन करून कॅमेऱ्यासमोर सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणाऱ्या कंटेंटवर पुणे पोलिसांनी कडक नजर ठेवली असून, अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Maharashtra live : शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगागोलीत केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय अंतर्गत कापसाची खरेदी करण्यात येत आहे मात्र कापूस घेऊन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतातील कापूस वाहनात भरून सीसीआय खरेदी केंद्रावर दाखल झाले आहेत
Raj Thackeray Live : 'वंदे मातरम'वर चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मुलं पळवणारी टोळी दिसत नाही का? - राज ठाकरेआज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही , अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Nagpur live : 'नागपुरातील संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांची राष्ट्रवादी राहणार अनुपस्थितनागपुरात संघाने आयोजित केलेल्या उद्याच्या बौद्धिकाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही. संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची, आमदार अमोल मिटकरी यांची 'साम'शी बोलतांना प्रतिक्रिया.
Belgaum News : विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक; शिक्षकाला बेळगुंदीत चोप, रात्री उशिरापर्यंत गावात तणावबेळगाव : बेळगुंदी येथील एका शाळेतील शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. माहिती पसरताच गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १२) शाळेत धाव घेत शिक्षकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने शिक्षकाला गावकऱ्यांच्या तावडीतून बाहेर काढत ताब्यात घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नाही. दरम्यान, शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
Lionel Messi : कोलकात्यात दिवाळी! मेस्सीचे विमानतळावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजीअर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी हा तीन दिवस भारत दौऱ्यावर आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्याचे आगमन कोलकाता विमानतळावर झाले. चोख सुरक्षा बंदोबस्तात मेस्सी बाहेर येताच त्याला पाहण्यासाठी जमलेल्या फुटबॉल चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोलकातामधील रस्त्यांवर ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. तसेच विमानतळ परिसरात तर फॅन्सनी तोबा गर्दी केली होती. मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली अशा ४ शहरांचा दौरा करणार आहे.
Washim News : भाजपची १६ बंडखोरांवर कठोर कारवाई; पक्षातून सहा वर्षांसाठी केलं निलंबितवाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या १६ बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केलीये. भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी या सर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Railway News : पंढरपूरहून तिरुपतीसाठी आजपासून नवी रेल्वे, अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णसोलापूर : पंढरपूरहून लातूरमार्गे तिरुपतीला जाण्यासाठी साप्ताहिक रेल्वे शनिवार (ता.१३) पासून सुरू होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर आता थेट तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांना जाता येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची तिरुपती पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूर मार्गे सुरू करण्याला नुकतीच मंजुरी दिली आहे.
Belgaum Weather : हुक्केरीत ५.२, तर बेळगावात ८.२ अंश; राज्यातील सर्वांत कमी तापमान नोंदबेळगाव : हुक्केरी तालुक्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, गुरुवार पेक्षा आज तापमान आणखी २ अंशांने घसरले आहे. शुक्रवारी (ता. १२) हुक्केरी तालुक्याचे तापमान ५.२ इतके राहील. तर बेळगाव तालुक्याच्या तापमानात देखील ४.२ अंशाने घट झाली असून, बेळगावचे तापमान ८.२ इतके नोंदविले गेले आहे.
P. G. Medhe Passed Away : ज्येष्ठ साखरतज्ज्ञ पी. जी. मेढे यांचे निधनकोल्हापूर : टिंबर मार्केट परिसरातील साखर उद्योगाचे ज्येष्ठ अभ्यासक पी. जी. मेढे (वय ७८) यांचे काल मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.
Kolhapur News : जिल्हाधिकारी कार्यालयात 'बॉम्ब'च्या ई-मेलने खळबळकोल्हापूर : ‘जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटणार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे’, असा ई-मेल आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. दुपारी १२.२० पासून दुपारी २.३७ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासह आवारातील सर्व कार्यालये, पार्किंग, कँटीन परिसराची कसून तपासणी केली. यामध्ये कोठेही बॉम्ब आढळला नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर येथील कार्यालयीन काम पूर्वपदावर आले.
Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; वरवंटी येथे आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कारLatest Marathi Live Updates 13 December 2025 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर (वय ९१) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. १३) सकाळी अकराला वरवंटी (ता. लातूर) येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच केंद्र सरकारने २०२७ मध्ये होत असलेल्या जनगणना प्रक्रियेसाठी ११ हजार ७१८ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या जनगणनेमध्ये जातींचीही गणना होईल. लग्नसराईची धामधूम सुरू असताना सोने-चांदी दरवाढीचे नवे रेकॉर्ड नोंदवित आहे. आज एका दिवसात चांदीच्या दरात सात हजार, तर सोन्याच्या दरामध्ये चार हजार रुपयांनी वाढ झाली. त्याने चांदीचा प्रतिकिलोचा दर दोन लाखांवर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..