महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
Tv9 Marathi December 13, 2025 06:45 PM

बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. महिलांबद्दल आणि शारीरिक संबंधांबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. सांगायचं झालं तर, विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… तर अनेक वर्षांपूर्वी विनोद खन्ना यांच्या डान्सचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झालेला… आता बाप आणि मुलाच्या डान्सचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सांगायचं झालं तर, 2017 मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं. पण त्यांच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. 1968 मध्ये विनोद खन्ना यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं आणि असंख्य तरुणींच्या मनावर राज्य केलं… तेव्हा अनेक अभिनेत्रींसोबत विनोद यांचं नाव जोडण्यात आलं… त्यानंतर विनोद खन्ना यांनी अनेक महिलांसोबतच्या त्यांच्या संबंधांवर आक्षेप का घेतले जातात असा प्रश्न उपस्थित केला होता.

View this post on Instagram

A post shared by India Forums (@indiaforums)

अशात एका मुलाखतीत विनोद खन्ना यांनी महिलांसोबत असलेले संबंध आणि शारीरिक गरजांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं… विनोद खन्ना यांना अफेअर्स आणि महिलांसोबतच्या लैंगिक संबंधांबद्दलच्या अफवांबद्दल विचारण्यात आले. विनोद खन्ना म्हणालेले, ‘तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं आणि महिलांच्या बाबतीत मी संत नव्हतो… दुसऱ्यांप्रमाणे मला देखील शारीरिक संबंधांची गरज असते… महिलांशिवाय आपण याठिकाणी नसतो… शारीरिक संबंधांशिवाय आपण याठिकाणी नसतो… त्यामुळे महिलांसोबत असणाऱ्या माझ्या संबंधांवर कोणाला आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही…’ असं देखील विनोद खन्ना म्हणालेले.

विनोद खन्ना यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट आणि दुसरं लग्न

विनोद खन्ना यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर. त्यांचं पहिलं लग्न गीतांजली यांच्यासोबत झालेलं. त्यानंतर दोन मुलांना जन्म दिला. अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी त्यांच्या दोन मुलांची नावे… पण पहिल्या पत्नीसोबत विनोद यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 1985 मध्ये विनोद यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1990 मध्ये दुसरं लग्न कविता खन्ना यांच्यासोबत केलं…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.