दादागिरीविरोधात एकत्र येणार
esakal December 14, 2025 12:45 PM

दादागिरीविरोधात एकत्र येणार
विलास पोतनीस यांचा भाजपला इशारा
विरार, ता. १३ (बातमीदार)ः भाजपला आता शिंदे-सेनेची गरज उरलेली नाही आणि ‘गरज सर्व आणि वैद्य मरो’ हीच भाजपची नीती आहे. सर्वजण एकत्र येणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नेते माजी आमदार विलास पोतनीस यांनी दिले. विरार येथील शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.
विरार शहरात ठाकरे गटाचा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला माजी आमदार विलास पोतनीस, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, विवेक पाटील, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत उपस्थित होते. या वेळी माजी आमदार विलास पोतनीस यांनी वसई-विरार पुरतेच नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्रात स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. लोकांच्या मनात ठाकरे यांच्याबद्दलचा विश्वास दृढ आहे. कुणाचे घर फोडण्याचा किंवा कोणाला प्रलोभने पदाखवून पक्षात आणण्याचा प्रयत्न केला नाही. लोक स्वतःहून शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----------------------------
बविआसोबत चर्चा
मराठी माणसाला कोणी हद्दपार केले, हे जनता जाणते. लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यात शिवसेनेचे योगदान आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची संधी शिवसेनेने दिली. तसेच बहुजन विकास आघाडीला सोबत घेत पालिका निवडणुकीत एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.