गुणवत्तापूर्ण ज्ञानदानामुळे शिक्षकांचा सन्मान
पालघर (बातमीदार) ः शासनाच्या शाळांमध्ये नावीन्यपूर्ण अध्यापन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना संपर्क फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील, आहारतज्ज्ञ प्राचार्य संभाजी भोजने आणि संपर्क फाउंडेशनच्या राज्यप्रमुख मयूरी कुलकर्णी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील ८०० शाळांमध्ये राबवले जात असून आतापर्यंत ६०५ संपर्क टीव्ही, १,०३० शैक्षणिक साहित्य शाळांना प्रदान करण्यात आले आहे.