प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरी असावी असे वाटते. ही नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण अहोरात्र अभ्यास करतात. दरम्यान आता रेल्वे खात्यात नोकरी करण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी बातमी समोर आल आहे. भारती प्रक्रियेबाबत रेल्वे खात्याने मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने 2026 साली होणाऱ्या रेल्वे खात्यातील भरती प्रक्रियेसाठी किती पदे रिक्त आहेत आणि किती पदे भरावयाची आहेत, याचा अभ्यास चालू केला आहे. त्यासाठी भरती परीक्षांचे संभाव्य कॅलेंडरही जारी करण्यात आले आहे. या कॅलेंडरमुळे भविष्यात रेल्वे खात्यात भरती प्रक्रिये कधी राबवली जाईल, याची माहिती मिळणे सोपे होणार आहे.
परिणामी भरती प्रक्रिया राबवणे सोपे होणार आहे. 2026 साली होणाऱ्या भरती प्रकियेच्या समन्वायासाठी एका नोडल आरआरबीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आता सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक निश्चित दिशा मिळाली आहे.
विद्यार्थ्यांना नेमकी परीक्षा कधी होऊ शकते, याचा अंदाज आला असून त्यांना अभ्यासाचे नियोजन आखता येणार आहे. सरकारी नोकरीसाठी तरुण कित्येक वर्षे प्रयत्न करतात. अशा स्थितीत निश्चित वेळेत रेल्वे खात्यातील रिक्त जागांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.