लायन्सची संवाद यात्रा उत्साहात
esakal December 14, 2025 12:45 PM

लोणावळा, ता.१३ : ‘लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२’ तर्फे जिल्हा चेअरपर्सन मार्केटिंग सुधीर कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘कदम से कदम मिलाते चलो’ ही संवाद यात्रा पुणे-नाशिक-नगर परिसरात पार पडली. सदस्यसंख्या वाढविणे व ‘लायन्स मिशन १.५’ बाबत मार्गदर्शन हा यात्रेचा उद्देश होता.
लोणावळा येथे उपप्रांतपाल श्रेयस दीक्षित, प्रीती दीक्षित, देवल पारख, अमीन वाडीवाला, सुरैया वाडीवाला, विश्वनाथ पुट्टोल यांनी यात्रेस सुरवात केली.
दरम्यान लोणावळा, चाकण, नारायणगाव, नाशिक, रहाता, शिर्डी, नगर व पुणे शहरातील विविध क्लबमध्ये संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. यात्रेला जिल्हा व प्रांतस्तरीय पदाधिकारी, माजी पदाधिकारी व क्लब सदस्यांचा सहभाग लाभला.
कदम यांनी सदस्य वाढीसाठी प्रभावी पद्धती, समाजोपयोगी उपक्रमांची मांडणी व लायन्सच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. खुल्या चर्चेतून सदस्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या. आंतरराष्ट्रीय संचालक राज मुछाल, मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन विजय सारडा, उप प्रांतपाल श्रेयस दीक्षित, राजेंद्र गोयल यांच्या उपस्थितीत वाकड येथे संवाद यात्रेची सांगता झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.