Rehman Dakait : ज्याला दाऊद इब्राहिम देखील थरथर कापायचा, तो रहमान डकैत नेमका कोण? जाणून घ्या संपूर्ण कुंडली
Tv9 Marathi December 15, 2025 12:45 AM

आदित्य धर यांचा चित्रपट धुरंधर (Dhurandar) रिलीज होताच, पाकिस्तानमधील सर्वात क्रूर गँगस्टरपैकी एक असलेल्या रहमान डकैतबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय खन्ना याने रहमान डकैत (Rehman Dakait) याची भूमिका केली आहे. हा चित्रपट चांगलाच हीट ठरला आहे, या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना याने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. चला तर मग जाणून घेऊयात खरा रहमान डकैत कोण होता आणि त्याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा देखील का भीत होता? रहमान डकैतचं खरं नाव सरदार अब्दुल कहमान बलूच होतं. रहमान डकैत याचा जन्म कराचीच्या ल्यरीमध्ये झाला. ज्या परिसरात रहमान डकैत याचा जन्म झाला, कराचीचा तो भाग पूर्वीपासूनच ड्रग्स तस्करी आणि गँग कल्चरमुळे बदनाम होता.

दरम्यान रहमान डकैत याचा जन्म नेमका कधी झाला, याबद्दल वेगवेगळी माहिती आहे, मात्र साधारणपणे 1975 ते 1980 दरम्यान त्याचा जन्म झाला असं मानलं जातं. डकैत याचं बलपण गुन्हेगारीच्या घटनांनी भरलेलं होतं. डकैत याला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, त्याचे वडील मोहम्मद दादल हे एक मोठे ड्रग्स तस्कर होते. डकैत याने वयाच्या 13 व्या वर्षी पहिला हल्ला केला, ही तर त्याची सुरुवात होती.

आपल्याच आईची हत्या

रहमान डकैत हा इतर गँगस्टरपेक्षा खूपच क्रूर होता, त्याच्यावर जे गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, त्याच्यामध्ये त्याने आपल्याच आईची हत्या केल्याचा देखील आरोप आहे. आईचे दुसऱ्या टोळीतील सदस्यासोबत संबंध आहेत, असा संशय डकैतला होता, याच संशयातून त्याने आपल्या आईची हत्या केली, त्याने गळा दाबून आपल्या आईला मारलं, आणि तिचा मृतदेह फॅनला लटकवला होता.रहेमान डकैत जेव्हा कोणाचीही हत्या करायचा तेव्हा, आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी मृतदेहाच मुंडक कापून तो ते त्या संपूर्ण परिसरात फिरवायचा.

दाऊद सोबत वाद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जेव्हा भारतातून पळून पाकिस्तानला गेला, तेव्हा कराचीमध्ये एका जमिनीवरून त्याचा आणि डकैत याचा थेट आमना-सामना झाला. असं म्हटलं जातं की, डकैत याने दाऊदचा भाऊ नूर उल हक याला किडनॅप केलं होतं, त्याचा प्रचंड छळ करण्यात आला, त्यानंतर दाऊदचा भाऊ एका ठिकाणी संशयास्पदरित्या मृत अवस्थेमध्ये आढळून आला. त्या काळात दाऊद याना थेट कोणी आव्हान देत नव्हतं, मात्र दाऊदच्या भावालाच कीडनॅप केल्यामुळे डकैत याचा दबदबा संपूर्ण पाकिस्तानात निर्माण झाला. दाऊद देखील त्याला घाबरून राहत होता, अशी माहिती समोर येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.