Gujarat Crime News : घरातील जुन्या रितीरिवाजांमुळे बळजबरीने बालविवाह लावण्यात आल्याने एका तरुणाने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची घटना (Child Marriage Case) उघडकीस आली आहे. या तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहसिन मामन (वय 18) असून मृत महिलेचे नाव गुलसुम मामन (वय 19) आहे. गावातील परंपरांनुसार सुमारे दोन वर्षांपूर्वी दोघांचा बालविवाह लावण्यात आला होता. मात्र, मोहसिनचा या विवाहाला विरोध होता. लग्नाआधीपासूनच त्याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे संबंध गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते आणि विवाहानंतरही त्याने ते तोडले नाहीत.
प्रेमसंबंधांमध्ये पत्नी ठरत होती अडथळाया कारणावरून मोहसिन आणि गुलसुम यांच्यात सतत वाद होत होते. पत्नी आपल्याला प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याची भावना आरोपीच्या मनात निर्माण झाली होती, असा पोलिसांचा संशय आहे. याच तणावातून शुक्रवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वादाच्या भरात मोहसिनने गुलसुमचा सुऱ्याने गळा चिरून तिची हत्या केली.
Latur Crime : हातपाय बांधून जिवंत जाळलं! चार तास जळत राहिली कार, तडफडून तडफडून तरुणाचा अंत; अनैतिक संबंधातून क्रूर कृत्य? विहिरीत आढळला गुलसुमचा मृतदेहहत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून मोटारसायकलवरून शेतात नेण्यात आला आणि जवळच्या विहिरीत फेकून देण्यात आला. शनिवारी सकाळी गुलसुम घरी नसल्याचे लक्षात येताच तिच्या माहेरच्यांनी शोध सुरू केला. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विहिरीत तिचे कपडे तरंगताना दिसून आले. तपास केल्यानंतर विहिरीत गुलसुमचा मृतदेह आढळून आला. यानंतर गुलसुमचे वडील रामजू मामन (वय 53) यांनी माधापार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मोहसिन आणि गुलसुम चुलत भाऊ-बहीणतक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना नाना वरमोरा गावात (ता. भुज, जि. कच्छ) घडली. पोलीस अधिकारी जडेजा यांनी सांगितले की, मोहसिन आणि गुलसुम हे चुलत भाऊ-बहीण होते. या विवाहाला आरोपीचा विरोध होता, मात्र कौटुंबिक दबावामुळे लग्न लावण्यात आले. याच रागातून आणि मानसिक तणावातून त्याने पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून हत्येसाठी वापरलेला सुरा आणि मोटारसायकल जप्त केली असून, मोहसिन सध्या पोलीस कोठडीत आहे.