Footballer Lionel Messi Education: अर्जेटिंनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी 14 वर्षानंतर भारतात आला आहे. त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी कोलकत्त्यात जमा झाले होते. काही तर लग्न थांबवून मैदानावर आले होते. त्यानंतर कोलकत्ता येथील सॉल्टे लेक मैदानावर खुर्च्या, पाण्याच्या बॉटलचा चाहत्यांनी रागा रागात फुटबॉल केला.
अर्जेटिंनामध्ये 6 व्या वर्षी शाळेत शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येतो. येथे 11 व्या वर्षापर्यंत त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर त्यानंतर तो माध्यमिक शिक्षणाकडे वळला. अर्जेटिनामध्ये मेस्सी किती शिकला ही खातरीलायक माहिती समोर येत नाही. त्याने सांता फे राज्यातील रोसारियोमधील एस्कुएला क्रमांक 66 जनरल लास हेरास येथे शिक्षण पूर्ण केले. ही शाळा घरापासून दूर नव्हती.
मेस्सी हा शिक्षण सर्वसाधारण विद्यार्थी होता. तो अत्यंत शांत स्वभावाचा होता. पुढे त्याचे कुटुंब बार्सिलोना येथे स्थायिक झाले. त्याने येथील टॉप फुटबॉल ट्रेनिंग सेंटर ला मासियात प्रवेश घेतला आणि त्याचे नशीब पालटले. मेस्सीने लियोन XIII शाळेत प्रवेश घेतला.
लियोनेल मेस्सीने फुटबॉल करिअरमध्ये मोठी झेप घेतली. त्याने 2009-2012, 2015, 2019, 2021 आणि 2023 यादरम्यान 8 बॅलोन डी’ पुरस्कार आणि विक्रमी 6 युरोपीयन गोल्डन शू जिंकले. त्याने करिअरमध्ये 850 हून अधिक गोल केले. तो फुटबॉल इतिहासातील एक लोकप्रिय खेळाडू आहे.