२९ महानगरपालिकांच्या निवडणूकांचं बिगुल वाजणार
Amravati Live: अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावाअमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने तयारी केली आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीच्या शासकीय विश्राम भवनात निवडणुकीच्या तयारीसाठी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली जाईल, अशी घोषणा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमरावतीत केली होती. अमरावती महानगरपालिकेतील विविध प्रभागांमध्ये पक्षाची ताकद किती आहे, याचा आढावा घेण्यात आला.
Pune Live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
१४ फुटी अश्वरुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
Pune Live: पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटनपुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
६० वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेच्या तब्बल ३ हजार कोटींच्या ६० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकात पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ कार्यक्रमाला उपस्थितीत
पुण्यात गणेश कला क्रीडा येथे होतोय कार्यक्रम
Sangli live : सांगलीत महाविकास आघाडीचे नेत्यांची बंद दार आड चर्चासांगली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेत्यांची बंद दार आड चर्चा
जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्यात गुप्त चर्चा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा सुरू असल्याची
महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित लढण्या बाबत चर्चा !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थितती लावल्यानंतर तिन्ही नेत्यां मध्ये झाली चर्चा.
Maharashtra live : पारगावमध्ये आठ वर्षाचा मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यूपारगावमध्ये आठ वर्षाचा मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Parbhani Live : परभणीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून रस्ता रोको आंदोलनगंगाखेडच्या G7 आणि परभणीच्या अमडापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने अद्यापही एफआरपी जाहीर केला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको
परभणी गंगाखेड महामार्गावरील खळीपाटी या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन
Dhule Live : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलंधुळे शहरातील मोहाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Pune Live : जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूजुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतालगत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने ८ वर्षांचा चिमुकला बाबु नारायण कापरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pune Live : मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी शितल तेजवानीच्या जामीन अर्जावर सुनावणीपुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी शितल तेजवानी हिच्याबाबत आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. शितल तेजवानीला आज न्यायालयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता असून, तिची येरवडा कारागृहात रवानगी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
PuneLiveupdate : दिग्विजय पाटील आज किंवा उद्या पुणे पोलिसांकडे जबाब नोंदवण्याची शक्यतादिग्विजय पाटील आज किंवा उद्या पुणे पोलिसांकडे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील पुणे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एका मीडिया कंपनीचा सहभाग असल्यामुळे दिग्विजय पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. खडक पोलिस ठाण्यात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जबाब नोंदवण्यासाठी दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांकडे वेळ मागितली होती.
Sangli Liveupdate : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळाआज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगली शहरातील शिंदेमळा येथील लव्हली सर्कल येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा आहे. अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला आहे.
Mumbai : पंकजा मुंडेंच्या पीएला पुन्हा अटकमंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पुन्हा अटक करण्यात आलीय. पत्नीचा मानसिक छळ केल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप अनंत गर्जेवर आहे. आता त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
Pune News : पुण्यात ई-स्क्वेअर थिएटरजवळ प्रचंड वाहतूक कोंडीपुणे - पुण्यातील ई-स्क्वेअर थिएटर जवळ वाहतूक कोंडी या ठिकाणी रात्री एक खासगी बस मेट्रो स्टेशनच्या खांबाला धडकल्यामुळे झाला अपघात अपघातामुळे या ठिकाणची एक लेन बंद ठेवण्यात आली असल्याची पोलिसांची माहिती आज सोमवार आणि सकाळच्या सत्रात ऑफिस महाविद्यालयांना जाणारा नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन औंध पिंपरी चिंचवड कडून येणाऱ्या नागरिकांनी खडकी अंडरपास द्वारे शिवाजीनगर च्या दिशेने प्रवास करावा, वाहतूक पोलिसांचे आवाहन बाणेर कडून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या नागरिकांनी एबीला ऊस येथून डावीकडे वळून घेऊन रेंजल मार्गे पुढे जावे
Pune : पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघातपुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तर ट्रकचं मोठं नुकसान झालंय. ट्रकचालक जखमी झाला आहे.
Pune Live : पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठकपुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक
युतीची चर्चा करण्यासाठी आज पहिली बैठक
कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांची बैठक
सगळे शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित
पुण्यासाठी प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी सुरू
Solapur Live : सोलापूरमध्ये भाजपचा उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवार आला बैलगाडीतूनइच्छुक असणाऱ्या विजय यादव यांनी गाईला चारा भरवत बैलगाडीतून उमेदवार अर्ज खरेदी करण्यासाठी भाजप कार्यालय गाठले
भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री करण्यात आली
यावेळी इच्छुक उमेदवार विजय यादव यांनी गाईला चारा भरवून बैलगाडीतून उमेदवारी अर्ज खरेदी केला.
या अनोख्या अर्ज खरेदीची चांगलीच चर्चा रंगलीय
Pune Live : राजगुरुमध्ये क्लास सुरु असतानाच विद्यार्थाचा गळा चिरलापुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खासगी क्लास सुरु असताना एका विद्यार्थ्याच्या वर्गमित्रानेच गळा चिरला अन् बाईकवरुन पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
Yawatamal Live : यवतमाळमधील मुडाणा गावात घराला भीषण आगयवतमाळ जिल्ह्यातील मुडाणा गावात घराला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
Tesjashri Ghosalkae : तेजश्री अभिषेक घोसाळकर यांचा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामाशिवसेनेतील सहकारी शिवसैनिकांना उद्देशून भावनिक पत्र लिहित तेजश्री अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पती अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येनंतर आयुष्यात मोठे बदल झाले असून दोन लहान मुलांची जबाबदारी, जनतेचा विश्वास आणि सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Municipal Elections : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता!मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होईल, असे सांगण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nitin Navin : नितीन नवीन भाजपचे कार्यकारी अध्यक्षनवी दिल्ली : दीर्घकाळापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचे भिजत घोंगडे पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते जागा घेतील. भाजप संसदीय मंडळाकडून नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
Bengaluru News : ज्येष्ठ नेते शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधनबंगळूर : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शमनूर शिवशंकरप्पा यांचे आज (ता. १४) सायंकाळी ६.४५ वाजता निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यापासून वयोमानाशी संबंधित आजाराने ग्रस्त असलेले शमनूर शिवशंकरप्पा यांना बंगळूरमधील स्पर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु उपचारात यश न आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांचे ते वडील होत. कर्नाटकच्या राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे शमनूर शिवशंकरप्पा हे अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय होते. त्यांनी सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून काम केले. राज्यातील विविध सरकारांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळून मंत्री म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले. वीरशैव लिंगायत समाजाची आघाडीची संघटना असलेल्या अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजाच्या धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी सेवा केली. त्यांच्या निधनाच्या बातमीने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाबाहेरील नेत्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
CM Fadnavis : इचलकरंजीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थितइचलकरंजी : येथील मलाबादे चौकात साकारण्यात आलेल्या शंभूतीर्थावरील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज (ता. १५) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने महापालिकेच्या ५११ कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ' आरेखनात मोठा बदल; सोलापुरातून मार्गबदल, चंदगडमधून जाणारLatest Marathi Live Updates 15 December 2025 : बहुप्रतीक्षित शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर-रत्नागिरी महामार्गाला समांतर असल्याने त्याच्या आरेखनात सोलापूरपासून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून पुढे पत्रादेवीला जाईल आणि या महिन्यामध्येच (डिसेंबर २०२५) प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. तसेच दीर्घकाळापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचे भिजत घोंगडे पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते जागा घेतील. कर्नाटक राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, सोमवारपासून (१५ ते १९ डिसेंबर) अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातील कामकाज सुरू होणार आहे. अथणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..