छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. 'वचन दिले तू मला' या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. या मालिकेत 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत मालिकेत इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत आहे. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मिलिंद गवळी नकारात्मक भूमिकेत आहेत. मात्र या मालिकेत एक जुना चेहराही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अभिनेत्री श्वेता पेंडसे हिने या मालिकेतून तब्बल ७ वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना कसा वाटलाय हे पाहूया.
मालिकेच्या पहिल्या भागात ऊर्जाची गुंडांसोबत मारामारी दाखवण्यात आलीये. त्यात इंद्रनीलची देखील एंट्री आहे. तर स्टार प्रवाहने नुकताच या मालिकेचा पहिला भाग आवडला का असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला आहे. यावर नेटकऱ्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्यात. एकाने लिहिलं, 'खूप छान', आणखी एकाने लिहिलं, 'कमाल एपिसोड. इंद्रनील कामतची धमाकेदार एंट्री. आता स्टार प्रवाहचा टीआरपी सतत वाढत राहणार', दुसऱ्याने लिहिलं, 'मस्त होता पण trp वाढल्यावर स्टोरी चेंज करून बोर करू नका म्हणजे झालं.'
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
एकाने लिहिलं, 'वचन दिले तू मला मालिकेचे एपिसोड खूप छान होता. फक्त निगेटिव्ह कॅरेक्टर खूप जास्त प्रमाणात आहे. दिव्या जहागीरदार, तीर्था जहागीरदार होणारा नवरा . व शौर्य ची मैत्रीण, हर्षवर्धन जहागीरदार, पॉझिटिव्ह कॅरेक्टर फक्त ऊर्जा,ऊर्जा ची आई , व शौर्य आणि शौर्याचा भाऊ इतकेच आहे. त्या प्रमाणात लक्ष्मीच्या पावलांनी मालिका खूप प्रमाणात हिट होती. त्या मालिकेचा टाईम स्लॉट चेंज करायला पाहिजे होता.' आणखी एकाने लिहिलं, 'अतिशय वाईट होता.' दुसर्याने लिहिलं, 'खुप भंगार लक्ष्मीच्या पावलांनी खुपच म्हणजे खुपच छान होती.'
एकूणच प्रेक्षक 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेला मिस करत आहेत. त्यामुळे आता नव्या मालिकेला तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण करायला वेळ लागेल हे मात्र नक्की.
तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत आली लोकप्रिय अभिनेत्री; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसली, प्रेक्षकांनी पाहताच ओळखली