Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले
esakal December 16, 2025 07:45 PM

कोल्हापूर : निवडणुकी ची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सायंकाळपासून इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्रीतच अनेक ठिकाणचे रस्ते, चौक मोकळे झाले.

निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्तीची प्रक्रियाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उद्यापासून (ता. १६) संबंधितांना नेमणुकीचे आदेश दिले जातील. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर महापालिकेने शहरातील विविध भागांत लावण्यात आलेले इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली.

Kolhapur Citywide Clearance : कोल्हापूरात महापालिकेची धडाकेबाज कारवाई; जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील ११ अनधिकृत शेड हटवून १३ हातगाड्या जप्त

मध्यवस्तीतील भागातील फलक सायंकाळपर्यंत निघाल्याचे दिसत होते. काही इच्छुकांनी स्वतःच विविध ठिकाणचे फलक काढून घेतले. उपनगरात मात्र फलक काढण्यास उशीर होत असून, उद्या सर्व ठिकाणचे फलक काढले जाणार आहेत.

याबरोबरच विविध वार्ताफलक, उद्घाटनाच्या कोनशिला यांच्यावर कापड तसेच कागद चिकटवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला उद्यापासून वेग येणार आहे. एकीकडे रस्त्यावर कारवाई केली जात असताना निवडणूक कामकाजासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जात होती.

Kolhapur Municipal Election : महापालिका निवडणुकीचा बिगुल जवळ; सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती, आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता

सात निवडणूक निर्णय अधिकारी नेमले असल्याने सात कार्यालय होणार आहेत. त्या कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांतील इच्छुकांचे अर्ज भरण्यापासून, त्यांची छाननी, चिन्ह देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

त्यामुळे तिथे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच भरारी पथकांपासून विविध नियुक्तीचे आदेश काढण्यासाठी कामगार विभागाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. त्यांच्याकडून संबंधितांना उद्यापासून नियुक्तीचे आदेश काढले जाऊन त्या-त्या कार्यालयांना, विविध कामांना सुरुवात केली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.