विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मीरा -भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्य गुन्हे शाखेने याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला ताब्यात घेतलं आहे. या कुख्यात गुंडाला उत्तर प्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक करण्यात आली आहे.
आयुक्तलयाच्या गुन्हे शाखेने सुभाषसिंग ठाकूरला मंगळवारी सकाळी ठाणे न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आहे.
मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तरमिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील मनवेलपाडा परिसरात २६ फेब्रुवारी २०२२ रोजी चाळ बिल्डर समय चौहान यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गॅंगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार, मीरा भाईंदर गु्न्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या बंदोबस्तात सुभाषसिंग ठाकूर याला फतेहगढ कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या बंदोबस्तात लखनऊ एअरपोर्टवरून त्याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले.
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाला अटक, मारहाण प्रकरण भोवलंकुख्यात गुंडाला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या बंदोबस्तात सुभाषसिंग ठाकूर याला फतेहगढ कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर लखनऊ विमानतळावरून त्याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपीला ठाणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.
मीरा-भाईंदर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठाण्यातील न्यायालयात हजर केले. दरम्यान, या प्रकरणात न्यायाधीशांनी त्याला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.