कोल्हापूर : इस्राइलमध्ये भारतातील कुशल बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर ही मागणी कळवून महिना उलटला आहे; परंतु युद्धाचे सावट आणि जाचक अटींमुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार या ठिकाणी जायला तयार नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे जिल्ह्यातून एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राइलमध्ये काम करण्याची संधी दिली आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर–पन्हाळा रोडवर केर्लीजवळ पाठीमागून धडक; दुचाकी अपघातात ४२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यूयासाठी निवड झालेल्या कामगारांना इस्राइलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित व चांगल्या वातावरणात काम मिळावे, यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील, असे आश्वासित केले आहे. इस्राइल देशात कुशल मनुष्यबळाची मागणी आहे.
त्यामध्ये विशेषत: बांधकाम कामगारांचा समावेश आहे. २६०० जागांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज मागविले आहेत. https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर हे अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जात आहेत.
Kolhapur Construction Worker : कागलमध्ये ३० हजारांवर बांधकाम कामगार! फुगलेली नोंदणी उघड प्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आवाज बुलंदकोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मागणीला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता होती; परंतु, महिना झाला तरी अद्याप एकही अर्ज बांधकाम कामगारांकडून करण्यात आला नसल्याचे चित्र आहे. याला इस्राइल - पॅलेस्टाईन युद्धाचे सावट हे प्रमुख कारण आहे. कामगारांच्या कुटुंबीयांनाही याचे टेन्शन आहे.
त्याचबरोबर येथे इंग्रजी भाषा अनिवार्य असून, तेथील स्थानिक भाषेचाही अडसर येऊ शकतो. यासह अन्य अटी जाचक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. नोकरीसाठी अटी व लाभ असे : कामगारांची वयोमर्यादा २५ ते ५० वर्षे वयोगटातील असावा शिक्षण १० वी उत्तीर्ण असावे इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
कामगाराला किमान एक ते पाच वर्षांच्या नोकरीसाठी करारावर स्वाक्षरी करणे अनिवार्य किमान तीन वर्षांचा अनुभव असावा इस्राइलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आरोग्य विमा, राहण्याची आणि जेवणाची सुविधा पात्र उमेदवारांना महिन्याला एक लाख ६२ हजार ५०० रुपये पगार इस्राइलमध्ये भारतातील बांधकाम कामगारांना मागणी आहे.
त्यामुळे राज्य सरकारकडून महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात आहे. यासंदर्भात इच्छुकांकडून कार्यालयाकडे येऊन विचारणा केली जात आहे; परंतु जिल्ह्यातून अद्याप एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
- जमीर करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकासgfr
रोजगार मार्गदर्शन केंद्र इस्राइलमध्ये बांधकाम कामगारांना नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत नाही. येथे जाण्याची कोणाचीही मानसिकता दिसत नाही. येथील सतत युद्धाचे धगधगते तणावपूर्ण वातावरण, त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये भीती, भाषेची अडचण अशा विविध कारणांमुळे येथील कामगारांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सरकारने जाचक अटी शिथिल करणे गरजेचे आहे.
- शिवाजी मगदूम, सचिव, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना