कळवण: गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात हलविणे तसेच प्रसूत महिलांना घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून शासनाने १०२ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंडासह महिलांना प्रचंड त्रासही सहन करावा लागत आहे.
असाच काहीसा प्रकार १०२ क्रमांकावर संपर्क साधूनही तालुक्यातून एकही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने अखेर गर्भवती महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करत नातेवाइकांनी खासगी वाहनातून आणत उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्याचा प्रसंग अतिदुर्गम भागातील मळगाव बुद्रूक येथील गरोदर आदिवासी महिलेवर रविवारी (ता. १४) ओढवला.
तालुक्यातील मळगाव ( बुद्रूक) येथील मोहना उलूशा पवार या गरोदर महिलेला रविवारी रात्री आठच्या सुमारास प्रसुतीकळा जाणवू लागल्याने नातेवाइकांनी महिलेस दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यासंदर्भात मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बागुल यांना सांगितले.
सरपंच सुकदेव बागुल यांनी रात्री नऊच्या सुमारास ''१०८ '' या ॲम्बुलन्सला कॉल करूनही तालुक्यातून कोठूनही ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही. अखेर ''१०२ '' या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही कोठूनही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.
टायर पंक्चरचे उत्तर
रुग्णवाहिकेसाठी कॉल करण्यात दोन-तीन तास वेळ जाऊनही शासनाची रुग्णसेवा मिळाली तर नाहीच. उलट १०२ क्रमांकावर संपर्क साधला असता काही वाहनांचे टायर पंक्चर आहे, चालक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी ड्रायव्हर उपलब झाले नसल्याची कारणे सरपंच सुखदेव बागूल यांना फोनवर सांगण्यात आली.
Lift Collapse : लिफ्ट दुर्घटनेतील 'त्या' जखमी तरुणाचा मृत्यूवारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने व महिलेची पहिली खेप सिझर झालेली असल्याने या दुसऱ्या वेळी गरोदर महिलेला तीन-चार तास वेदना सहन करायला लागल्या. रुग्णवाहिका न आल्याने अखेर रात्री दहाच्या दरम्यान सरपंच बागूल यांनी गरोदर महिलेला खासगी रिक्षातून अतिदुर्गम भागातील मळगाव येथून सुमारे ३० किलोमीटर अंतरावरून रात्री बाराच्या सुमारास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.