टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी 20i मालिका अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यानंतर 2-1 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील चौथा आणि निर्णायक सामन्याचं आयोजन हे लखनौतील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र या सामन्यात टॉसही झाला नाही. धुक्यांमुळे हा सामना रद्द करावा लागला. त्याआधी टीम इंडियाने पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात भारतावर मात करुन विजयी खातं उघडलं होतं. त्यामुळे आता मालिकेचा निकाल काय लागतो? हे पाचव्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. हा पाचवा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना केव्हा?टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना शुक्रवारी 19 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कुठे?टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर जिओस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी या वेबसाईटवर सामन्याबाबत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
अक्षरनंतर शुबमन गिल आऊटटीम इंडियाला या मालिकेदरम्यान 2 मोठे झटके लागले. टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर अक्षर पटेल याला आजारामुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तर त्यानंतर शुबमन गिल दुखापतीमुळे चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे शुबमनच्या जागी संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. अशात आता संजूला आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठी खेळी करण्याची संधी आहे. एकूणच टीम इंडिया या सामन्यात कसा गेम करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.