तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी, यासाठी त्वरित करा 'हे' उपाय
Tv9 Marathi December 19, 2025 04:45 AM

हिवाळा सुरू झाला की आरोग्यासोबतच त्वचेच्या समस्याही निर्माण होतात. कारण या दिवसांमध्ये वातावरणात बदल होतात तसेच थंड वारे देखील अधिक वाहतात. तसेच हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की या सर्व कारणांमुळे कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. काही प्रमाणात ही कारणं खरं असले तरी आपल्या शरीरात थंडीच्या दिवसात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील त्वचा कोरडी होऊ शकते. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असेल, तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तुमच्या जखमा हळूहळू बऱ्या होत असतील, तर ही व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. तर आजच्या लेखात आपण या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घेऊयात.

थंडीच्या दिवसात व्हिटॅमिन सी का महत्त्वाचे आहे?

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये संसर्ग लगेच होते ज्यामुळे तुम्ही आजारी पडतात. व्हिटॅमिन सीची कमतरता ही चुकीचे आहार, जंक फूडचे जास्त सेवन, सतत अपचन, ताणतणाव किंवा अनियमित जीवनशैलीमुळे देखील होऊ शकते.

– व्हिटॅमिन सीच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये संत्री, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी आणि विशेषतः आवळा यांचा समावेश आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि त्वचेला चमक देण्यास मदत करते. त्यामुळे थंडीच्या दिवसात या फळांचा आहारात समावेश करा.

– आयुर्वेदात जीवनसत्त्वांच्या कमतरतेचा संबंध धातूंच्या क्षय आणि पचनशक्ती कमी होण्याशी जोडला गेला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की संतुलित आहार आणि योग्य दिनचर्येद्वारे या कमतरता टाळता येतात.

– व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यासाठी दररोज ताजी फळे आणि हंगामी भाज्या खा. दररोज एक आवळा खाणे पुरेसे आहे. इतर पदार्थांमध्ये पेरू, शिमला मिरची, ब्रोकोली, पपई आणि टोमॅटो यांचा समावेश नक्की करा.

या गोष्टी लक्षात ठेवा:

हिवाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. म्हणून, केवळ आहार पुरेसा नाही. फेस वॉशने पूर्णपणे मॉइश्चरायझिंग करणे देखील आवश्यक आहे. विशेषतः बाहेरून आल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करायला विसरू नका.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.