पुण्यातील अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून तातडीची कामे
१९ डिसेंबरला उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार
नागरिकांना पाणी साठवणुकीचे आवाहन
सागर आव्हाड, पुणे
पुणेकरांनो पाणी जपून वापरा. तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले असल्याने पुढील २४ तास पुण्यातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज १८ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणी नागरिकांना मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार,आज १८ डिसेंबर रोजी संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाजया पाणीपुरवठा बंदचा परिणाम येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, बडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगर (अंशतः), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी, जाधवनगर आदी परिसरांवर होणार आहे. या भागांतील रहिवासी, व्यापारी संस्था तसेच आस्थापनांनी पाणी साठवणूक करून ठेवावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.