वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा केवळ तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर घरात गृहकलह वाढतात, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येऊ शकतं, तसेच तुम्ही कितीही कमावलं तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, यालाच सोप्या भाषेत आपण घरात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, आपण जर हे उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात नेहमी सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी येते. चला तर मग आज आपण अशाच एका सोप्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.
पोपटांचं छायाचित्र – घरामध्ये अनेक पोपट असलेलं छायाचित्र लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. घराच्या उत्तर दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर घराची भरभराट होते. प्रगती होते. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात पोपटाचं छायाचित्र किंवा फोटो असेल तर घरामध्ये भांडणं देखील होत नाहीत.
जर तुमच्याही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील तर त्यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये सोपा उपाय सांगण्यात आला आहे, वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर मुलांना शिक्षणात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, असं वास्तूशास्त्र सांगतं, वास्तुशास्त्रामध्ये घरात पोपटाचं छायाचित्र लावण्याचे इतरही अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)