नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर, ओझर व चांदवड नगर परिषदांमधील सातपैकी सहा जागांसाठी शनिवारी (ता. २०) मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत या ठिकाणी मतदान होईल. रविवारी (ता. २१) सर्व जागांचे निकाल एकत्रितपणे जाहीर करण्यात येतील.
जिल्ह्यात ११ पालिकांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान घेण्यात आले. थेट नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगरसेवकपदाच्या २६६ जागांसाठी एक हजार २८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. मतदानाच्या काही तास आधी निवडणूक आयोगाने सिन्नरमधील चार, ओझर येथील दोन व चांडवडमधील एका जागेवरील निवडणुकीला स्थगिती दिली. या जागा सोडून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
यात सिन्नरमधील एक जागा माघारीअंती बिनविरोध झाल्याने उर्वरित सहा जागांसाठी मतदान होईल. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होईल. त्यामुळे आतापर्यंत घालमेल सुरू असलेल्या सर्वच उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागलेले राहील. यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, सिन्नर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, मनमाड, नांदगाव, सटाणा व येवला येथील नगर परिषदांचा समावेश आहे.
निकालाची तयारी पूर्ण
पालिकांच्या निकालाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, रविवारी सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ होईल. साधारणत: अकरापर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. प्रभागनिहाय मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून, थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्यांना प्रत्येक मतमोजणी टेबलवर प्रतिनिधी नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्वांत शेवटी नगराध्यक्षांचा निकाल जाहीर होईल.
Pusegaon Rath Yatra : साताऱ्यातील पुसेगावात सेवागिरी रथावर तब्बल ८७ लाखांची देणगी भाविकांकडून अर्पण; परदेशी चलनाचाही समावेशया जागांसाठी मतदान
सिन्नर : प्रभाग २ (अ) ओबीसी महिला, प्रभाग ४ (अ) एससी महिला, प्रभाग १० (ब) सर्वसाधारण
ओझर ः प्रभाग १ (अ) एससी, प्रभाग ८ (ब) सर्वसाधारण
चांदवड ः प्रभाग ३ (अ) ओबीसी