संजय गडदे, साम प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेत्री व प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही हिचा कॉन्सर्टसाठी जात असताना रस्ते अपघात झाला. दारूच्या नशेत असलेल्या एका वाहनचालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात नोरा फतेहीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये.
Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅगअपघातानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नोरा फतेही सुरक्षित असून तिच्या टीमकडून चाहत्यांना दिलासा देणारी माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मद्यधुंद वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार कामएका सूत्राने सांगितले की, "नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटासोबत तिच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या कार चालकानं एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचाकार चालक कार चालवताना दारू प्यायला होता. अपघात होताच अभिनेत्रीच्या टीमने तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी रक्तस्त्राव आणि अंतर्गत दुखापती तपासण्यासाठी ताबडतोब सीटी स्कॅन केल्याची माहिती मिळालीय. दरम्यान तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की नोराला किरकोळ दुखापत झालीय. तर दुसरीकडे पोलिसांनीगुन्हा दाखल करत चालकाला ताब्यात घेतले आहे. डॉक्टरांनी नोरा फतेहीला आराम करण्याचा सल्ला दिलाय. पण कार्यक्रम नियोजित असल्याने तिने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतलाय. नोरा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते आणि तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे.