लाखांदूर : चप्राड-दिघोरी मार्गावर अज्ञात पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री शिवाजी टी-पॉईंट परिसरात घडली.
महादेव केशव मेश्राम (वय ६२) असे मृताचे नाव आहे. ते येथील शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. महादेव मेश्राम हे सायंकाळी शिवाजी टी-पॉइंट परिसरातून दुचाकीने जात होते.
दरम्यान चप्राडकडून भरधाव वेगात आलेल्या एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील श्री. मेश्राम सिमेंट रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी वाहन चालक त्याच्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
Mahur Crime : पाचोंदा दुहेरी हत्याकांड; अवघ्या बारा तासांत आरोपी जेरबंदपरिसरातील नागरिकांनी जखमीला उपचारासाठी स्थानिक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात पिकअप वाहन व चालकाचा शोध सुरू आहे.