India Sqaud Against NZ: शुभमग गिलला वगळले, मग उप कर्णधार कोणाला केले? न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
esakal December 21, 2025 07:45 AM

India Sqaudfor ODI & T20I series Against New Zealand : भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकली. आता पुढच्या वर्षी भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संघ जाहीर केला आहेत. या पत्रकार परिषदेत वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही, पण ट्वेंटी-२० संघ ठरला आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका असणार आहे आणि त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये खेळणाराच संघ या मालिकेत खेळले हे जाहीर केले गेले. शुभमन गिलकडून उप कर्णधारपद काढून घेतल्याने अक्षर पटेल ( Axar Patel vice Captain) याच्याकडे पुन्हा उप कर्णधारपद आले होते. गिलच्या अनुपस्थितीत अक्षरने यापूर्वी ही जबाबदारी सांभाळली होती.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

सूर्यकुमार यादव म्हणाला की, गिलला वगळणे हे त्याच्या फॉर्मशी संबंधित नाही. वॉशिंग्टन सुंदर किंवा रिंकू सिंग सारख्या खेळाडूला घेऊन आम्हाला मधल्या फळीला बळकटी द्यायची होती. आम्हाला वरच्या क्रमांकावर एक यष्टीरक्षक हवा होता. आम्हाला रिंकू सिंगची गरज होती. आमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर देखील आहे. म्हणून, अनेक संयोजनांसाठी आम्हाला लवचिक राहण्याची आवश्यकता होती. म्हणूनच आम्ही हा संघ निवडला आहे.

India vs New Zealand ODI Schedule
  • ११ जानेवारी- वि. न्यूझीलंड, वडोदरा

  • १४ जानेवारी - वि. न्यूझीलंड, रायकोट

  • १८ जानेवारी - वि. न्यूझीलंड, इंदूर

India vs New Zealand T20I Schedule
  • पहिली ट्वेंटी-२० - २१ जानेवारी, नागपूर

  • दुसरी ट्वेंटी-२० - २३ जानेवारी, रायपूर

  • तिसरी ट्वेंटी-२० - २५ जानेवारी, गुवाहाटी

  • चौथी ट्वेंटी-२० - २८ जानेवारी, विजाग

  • पाचवी ट्वेंटी-२० - ३१ जानेवारी, त्रिवेंद्रम

भारतीय संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), अक्षर पटेल ( उप कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.