काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यामुळे बागुल नाराज होते. अखेर त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Ambernath Live : अंबरनाथ स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तणाव; शिंदे गट व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, राडाअंबरनाथ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोहचगाव परिसरात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. मतदारांना मतदान करू दिले जात नसल्याचा आरोप करत दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
Pune Live : आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल; प्रेझेंटेशननंतर पत्रकार परिषदआदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे पुणे महापालिकेची पोलखोल करणार आहेत. यासाठी ते सविस्तर प्रेझेंटेशन सादर करून पुणे महानगरपालिकेतील कथित अनियमितता आणि समस्या मांडणार आहेत.
Live Update: राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केलीराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही फरारी आरोपी प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून, त्यांची ओळख तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला रघु उर्फ प्रताप उर्फ इरपा उर्फ मुडेल्ला उर्फ सैलू आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असलेला शंकर महाका अशी पटली आहे.
Kolhapur Liveupdate: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरली विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून मारहाणअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून व विद्यापीठ गार्ड कडून मारहाण करण्यात आली आहे.
Puneliveupdate : पुण्यात शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का, बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेशपुण्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उल्हास बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय आणि पुणे महापालिकेतील माजी लोकप्रतिनिधी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदे यांची रणनीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ - दिप निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.
Puneliveupdate : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांची बैठक सुरूरविंद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे. पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको अशी मागणी केली आहे.
Mumbai liveupdate: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगायशवंतराव चव्हाण तृतीय महामार्गावर वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. आज शनिवार असल्यामुळे मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने त्यांच्या खासगी वाहनांनी रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली दिसते.
भाजपने दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केलं आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २२ जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. माजी नगरसेवक राहुल कलाटे, वडगाव शेरीचे आमदार बापूर पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सायली वांजळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळा धनकवडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण गलांडे, सतिश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे आणि पायल तुपे या सर्वांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे पुण्यात भाजपची ताकद चांगलीच वाढली.
maharashtra live : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्जअंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
भाजपकडून पैसे वाटण्यात आल्याचा शिंदेसेनेचा आरोप
परिसरात तणाव, कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी केला सौम्य लाठीचार्ज
घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त
Washim Live : वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानवाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे, वाशिमच्या लाखाळा भागातील प्रभाग क्रमांक 7 मधील खोली क्रमांक 2 मधील ईव्हीएम मशीन साधारणतः 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळापासून ईव्हीएम बंद
Kopargaon : मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाचीकोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ...
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची...
मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप...
पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची...
पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना नेले मतदान केंद्रापासून दूर...
मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक...
कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण...
मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही गटाच्या समर्थकांची गर्दी..
Akola News Live : अकोला महापालिकेत महायुती होणार?अकोला महापालिकेत महायुती होण्याची शक्यता आहेय. यासंदर्भात महायुतीतील भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं बोलतायेत. मात्र, निवडणुक जाहीर झाल्यानंतरही तिन्ही पक्षांच्या स्तरावर कोणतीही प्राथमिक चर्चा, बोलणी आणि निमंत्रण एकमेकांना देण्यात आलेलं नाहीय.
Pune news : पुण्यात ऑपरेशन लोटस, दिग्गजांचा भाजप प्रवेशमहानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सायला वांजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते.
Nagpur Live: नागपूर जिल्ह्यात 9 जागांसाठी आज मतदाननागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कामठी, नरखेड़, रामटेक आणि कोंढाली या भागांमध्ये एकूण ९ जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर प्रशासनाकडून शांततेत आणि सुरळीत मतदान होण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
Nagpur Live: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीरनागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणूक जाहीर होताच विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत, तसेच आम आदमी पार्टीने देखील आपले उमेदवार स्पष्ट केले आहेत. महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ठाकूरकर आणि नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनी पार्टीच्या या दहा उमेदवारांची यादी सादर केली. आम आदमी पार्टीच्या मतानुसार, या निवडणुकीत लोकांचे मूलभूत मुद्दे आणि शहराच्या विकासासाठीचे प्रश्न महत्त्वाचे ठरतील.
मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरूथंडी मुळे सकाळच्या टप्यात मतदारांचा ओघ कमी,सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीचा पारा घसरला
मोहोळमध्ये 11 ते 12 अंश तापमान असल्याने प्रचंड थंडी जाणवत आहे.
मतदान केंद्रांवर मतदार राजा संख्येने कमी,सकाळच्या सत्रात मतदानाला कमी प्रतिसाद
दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता,सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढाच्या नगरध्यक्षसह 31 जागा,मोहोळ नगरपरिषदच्या दोन प्रभाग,मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या एक प्रभागच्या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
चंद्रपुरात आणखी तिघांची किडनी काढलीसावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणाऱ्या रोशन कुडे प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुडे यांच्यासोबत उत्तरप्रदेशसह इतर दोन राज्यांतील आणखी पाच युवक कंबोडियात जाण्यासाठी निघाले होते.
मात्र, महाराष्ट्रातील नाशिक येथील एक युवक कोलकता विमानतळावरून पळून आला.
कुडे व अन्य तिघे कंबोडियात गेले आणि त्या चौघांची किडनी तिथे काढण्यात आली
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये आज मातदानसकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी
न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली होती प्रभाग 10 ची निवडणूक
दोन नगरसेवकपदांसाठी आज होतंय मतदान
प्रभागात सुमारे 4 हजार 200 मतदार
प्रभागात महायुती विरुद्ध उबाठा अशी थेट
महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात
तर 'उबाठा" कडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात
प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले होते
Kolhapur Crime : हुपरी हादरली! मालमत्तेच्या कारणावरून वृद्ध आई-वडिलांचा खूनहुपरी : येथे पोटच्या मुलाने जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांचा विळतीच्या धारधार पात्याने हाताच्या नसा कापून, तसेच त्यांच्या डोक्यात व तोंडावर काठीने जोरदार प्रहार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. विजयमाला नारायण भोसले (वय ७०) व नारायण गणपतराव भोसले (वय ८२) असे आई-वडिलांचे, तर सुनील नारायण भोसले (वय ४८) असे खून करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.
Phaltan-Mahabaleshwar Municipality : फलटण-महाबळेश्वर नगरपालिकांसाठी आज मतदानसातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक-निंबाळकर तर, माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होत असून आज या लढतीची मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
Jalgaon Election : जळगाव जिल्ह्यात पालिकेच्या १२ जागांसाठी मतदानाला सुरुवातगेल्या २ डिसेंबरला ७७ लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह अन्य अपील नसलेल्या ठिकाणी ४५२ नगरसेवकांसाठी एक हजार ४८८, असे एक हजार ५६४ उमेदवारांसाठी निवडणूक झाली. मात्र, १२ प्रभागांतील काही उमेदवारांनी हरकती घेतल्याने उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान घेण्यास व २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. आज अमळनेर १ 'अ', सावदा २ 'ब', ४ 'ब' आणि १० 'ब', यावल ८ 'ब', वरणगाव १० 'अ', १० 'क', पाचोरा ११ 'अ', १२ 'ब' आणि भुसावळ ४ 'ब', ५ 'ब', तसेच ११ 'ब', अशा सहा पालिकांतील १२ प्रभागांत मतदानाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी रविवारी होणार आहे.
Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना न्यायालयाचा दिलासानवी दिल्ली : पैशांच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी लोकपालांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली होती. याविरोधात केलेल्या अपिलाची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने लोकपालांचा आदेश रद्द केला आहे. ‘‘लोकपालांनी माझे लेखी म्हणणे न ऐकताच कारवाई करण्यास मंजुरी दिली,’’ असा दावा मोईत्रा यांनी केला होता.
Kannada Partner Ranya Rao : सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रन्या रावची याचिका फेटाळलीबंगळूर : सुमारे १५ कोटींच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रन्या राव, तसेच सहआरोपी तरुण राज आणि साहिल जैन यांनी बेकायदेशीर अटक केल्याबद्दल (हॅबियस कॉर्पस्) दाखल केलेली याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) फेटाळून लावली. परकीय चलन नियंत्रण व तस्करी प्रतिबंधक कायदा-१९७४ (कॉफेपोसा) अंतर्गत झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करत अभिनेत्री रन्याची आई हर्षवर्धिनी राव आणि इतर आरोपींच्या वतीने याचिका दाखल केली होती.
Municipal Council Voting : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर..मुंबई : राज्यातील २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायती तसेच १५४ सदस्यपदांसाठी उद्या (ता.२०) मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आल्यामुळे २ डिसेंबरला होणारे मतदान राज्य निवडणूक आयोगाने उद्यापर्यंत (ता. २०) पुढे ढकलले होते. अनगर, जामनेर, आणि दोंडाईचा या नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे जामनेर नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, काही सदस्यपदांसाठी उद्या (ता. २०) निवडणूक होणार आहे.
Ichalkaranji Municipal Corporation Elections : इचलकरंजीत भाजप आणखी धक्का देण्याच्या तयारीत, घडामोडींना आला वेगइचलकरंजी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे. पुढील दोन दिवसांत आणखी एका मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विरोधी आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढील काळात त्यांच्यासमोर आघाडी भक्कम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
Adv. Manikrao Kokate : माजी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासाLatest Marathi Live Updates 20 December 2025 : राज्यातील २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायती तसेच १५४ सदस्यपदांसाठी आज (ता.२०) मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. तसेच बनावट दस्तऐवज आणि फसवणूकप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. नाशिक सत्र न्यायालयाच्या दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली; मात्र त्यांच्या वरील दोष मात्र कायम ठेवण्यात आला आहे. मुली व महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एप्सस्टीन याच्याकडील ६८ नवीन फोटो समोर आले आहेत. यामुळे जभरात खळबळ माजली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..