Suryakumar Yadav & Ajit Agarkar explanation on Shubman Gill omission : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आज संघ जाहीर केला. उप कर्णधार शुभमन गिल याची उचलबांगडी करून निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शुभमनचा फॉर्म हा मागील बऱ्याच दिवसापासून चर्चेचा विषय बनला होता. पण, त्याच्याकडे उप कर्णधारपद असल्याने त्याची निवड निश्चित मानली जात होती. पण, शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत धाडसी निर्णय घेतला गेला अन् गिलची निवड झाली नाही.
शुभमनने २०२५ मध्ये १५ सामन्यांत २४.२५ च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत. त्याच्यासमावेशामुळे संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याची चर्चा होतीच. शुभमन हा भारताच्या वन डे व कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि वर्ल्ड कपनंतर त्याच्याकडे ट्वेंटी-२० संघाचेही नेतृ्त्व सोपवले जाईल, अशी चर्चा असताना हा निर्णय सर्वांना अचंबित करणारा ठऱला आहे.
India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला India T20 World Cup 2026 Group Stage Schedule:७ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध अमेरिका, वानखेडे स्टेडियम, मुंबई
१२ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध नामिबाया, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
१५ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध पाकिस्तान, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
१८ फेब्रवारी २०२६ - भारत विरुद्ध नेदरलँड्स, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
India Squad for T20I World Cup : सूर्यकुमार यादव ( कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल ( उप कर्णधार) , रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक), इशान किश ( यष्टिरक्षक) वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
अजित आगरकर म्हणाला, 'शुभमन गिलच्या धावा होत नाही आणि मागच्या वर्ल्ड कपलाही तो मुकला होता. आम्हाला वरच्या क्रमांकावर यष्टिरक्षक फलंदाज चांगला ठरेल असे वाटले होते. शुभमन गिल चांगला फलंदाज आहे. सूर्यकुमार जगातील नंबर १ ट्वेंटी-२० फलंदाज होता, तो काय करू शकतो, हे आम्हाला माहिती आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत आमच्या कर्णधाराने चांगली कामगिरी करावी यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.'
सूर्यकुमार यादवम्हणाला, "हे त्याच्या फॉर्मबद्दल नाही. ते फक्त संघाच्या संयोजनाबद्दल आहे. आम्हाला वरच्या बाजूला एक यष्टीरक्षक हवा होता. गिल त्याच्या फॉर्मबद्दल नाही. त्याच्या गुणवत्तेबद्दल काहीही बोलणे नाही. तो एक उत्तम खेळाडू आहे. आम्हाला रिंकू सिंगची गरज होती. आमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर देखील आहे. म्हणून, आम्हाला अनेक कॉम्बिनेशनसाठी लवचिक राहण्याची आवश्यकता होती. म्हणूनच आम्ही हा संघ निवडला आहे. गिलच्या क्लासबद्दल प्रश्नच नाही."