मुंबई : मध्य रेल्वेतर्फे रविवारी मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिका आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लाेकल सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम हाेणार आहे.
मध्य रेल्वेकुठे : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर
कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परिणाम : अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
अप मार्गावरील सिंहगड, राज्यराणी, डेक्कन क्वीन, जनता, काकीनाडा, प्रगती, सेवाग्राम, चेन्नई, वंदे भारत, बनारस, हावडा, हाटिया, कोइम्बतूर या एक्स्प्रेसवर, तर डाऊन मार्गावरील कोल्हापूर, गोंडा गोदान, जयनगर पवन, नेत्रावती या गाड्यांवर परिणाम हाेणार आहे.
Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती मेमू गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशनवसई रोड-दिवा ही सकाळी ९.५० वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपर येथे १०.३१ वाजता शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
दिवा-वसई रोड ही मेमू गाडी दिवाऐवजी कोपर येथून ११.४५ वाजता चालवण्यात येणार आहे. वसई रोड येथे ती १२.३० वाजता पोहोचेल.
कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून)
कधी : ११.५ ते १६.०५ वाजेपर्यंत
परिणाम : पनवेल येथून मुंबईकडे धावणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०.३३ ते १५.४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या लाेकल पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ९.४५ ते १५.१२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या लाेकल रद्द करण्यात येणार आहेत.
ट्रान्स हार्बरवरील पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या ११.०२ ते १५.५३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या आणि ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या १०.०१ ते १५.२० वाजण्यादरम्यानच्या लाेकल रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध राहील. तसेच बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवाही सुरू राहणार आहे.